Ashadhi Wari 2026 : अहिल्यानगर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आषाढी वारी नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेचे प्रतीक असून लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात. त्यामुळे वारी मार्गावरील सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून सुरक्षित, स्वच्छ आणि सुरळीत वारीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, महापालिका आयुक्त…
Author: Vinayak Lande
El Nino Water Crisis : अहिल्यानगर : जिल्ह्यात एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. कालवे व बॅकवॉटरमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा तत्काळ थांबवून संबंधितांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे कठोर निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले असून, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण आणि उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यावर भर दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पाणीसाठा आरक्षण व कृषी नियोजनाबाबतच्या तातडीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन…
85 Attendants Promoted to Health Worker : अहिल्यानगर : शासन निर्णय 2025 ची प्रभावी अंमलबजावणी करत अहिल्यानगर जिल्हा परिषदेत 85 परिचारांना आरोग्य सेवक पदावर पदोन्नती देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या इतिहासातील या विक्रमी निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने परिचारांना पदोन्नती मिळाल्याने हा एक विक्रम ठरला आहे. या ऐतिहासिक निर्णयानिमित्त परिचर संघटनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सांगितले…
MPSC Preliminary Exam 2026 : अहिल्यानगर : राज्यसेवेचे स्वप्न साकार करण्यासाठी तब्बल १७ हजारांहून अधिक उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी रविवारी मैदानात उतरणार असून, परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक सुरक्षा आणि नियंत्रणाची उपाययोजना केली आहे. १४ जून रोजी जिल्ह्यातील ५७ परीक्षा उपकेंद्रांवर १७ हजार ९४७ उमेदवार परीक्षा देणार आहेत. परीक्षा प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी हे आदेश जारी केले आहेत. परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी…
Census : अहिल्यानगर : वेगवान कामकाज, अचूक माहिती संकलन आणि प्रभावी जनसहभागाच्या जोरावर अहिल्यानगर महापालिकेने जनगणना मोहिमेत राज्यात दुसरे मानाचे स्थान मिळविले. विशेष म्हणजे ३० दिवसांचे उद्दिष्ट केवळ २१ दिवसांत पूर्ण करून प्रशासनाने नवा आदर्श निर्माण केला. भारत सरकारच्या गृह मंत्रालयामार्फत राबविण्यात आलेल्या जनगणना मोहिमेत मिळालेल्या या यशामागे प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर, सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, जनगणना कक्ष प्रमुख राकेश कोतकर, सर्व प्रभाग अधिकारी, ब्रँड अॅम्बेसेडर डॉ. अमोल बागुल, मास्टर ट्रेनर्स, प्रगणक, पर्यवेक्षक तसेच तांत्रिक पथक यांचे समन्वयपूर्ण नेतृत्व आणि अथक परिश्रम मोलाचे ठरले. या यशाबद्दल आयुक्त यशवंत…
Ahilyanagar Weather Alert : अहिल्यानगर जिल्ह्यावर पुढील दोन दिवस वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा धोका कायम राहणार असून हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ८ ते ९ जूनदरम्यान ‘येलो अलर्ट’ जारी केला असून जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस तसेच विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता असून वीज पडण्याच्या घटनांचा धोका लक्षात घेता नागरिकांनी झाडाखाली, वीजवाहिन्यांजवळ, ट्रान्सफॉर्मर, मोबाईल टॉवर, होर्डिंग्ज तसेच मोकळ्या…
Agriculture Solar pumps : अहिल्यानगर : राज्यातील शेतकऱ्यांच्या ऊर्जास्वावलंबनाला नवी उंची मिळाली असून महाराष्ट्राने सौर कृषिपंपांच्या स्थापनेत देशात ऐतिहासिक विक्रम नोंदविला आहे. पीएम कुसुम-बी व ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेअंतर्गत राज्यात १० लाखांहून अधिक सौर कृषिपंप कार्यान्वित झाले असून देशातील प्रत्येक तीनपैकी दोन सौर पंप महाराष्ट्रात उभे राहिले आहेत. देशातील एकूण १५.६२ लाख सौर कृषिपंपांपैकी तब्बल १० लाख ४७२ म्हणजेच ६४ टक्के पंप एकट्या महाराष्ट्रात कार्यान्वित झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभूतपूर्व कामगिरीबद्दल ऊर्जा विभाग, महावितरण आणि राज्यातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे. ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या…
PM Surya Ghar Yojana : अहिल्यानगर : घराघरांत सौरऊर्जेचा प्रकाश पोहोचवत महाराष्ट्राने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. एका दिवसात तब्बल ४,७०० घरांवर सौर प्रकल्प उभारण्याचा विक्रम करत राज्याने हरित ऊर्जेच्या क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणमार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राने मे महिन्यात देशातील सर्वाधिक ४ लाख ४९ हजार अर्ज प्राप्त केले. तसेच सौर प्रकल्पांच्या तपासणीत प्रथम, कंत्राटदार नोंदणीत द्वितीय आणि एकूण प्रकल्प उभारणीत द्वितीय क्रमांक पटकावत महाराष्ट्राने देशातील टॉप पाच राज्यांमध्ये दमदार उपस्थिती नोंदविली आहे. केंद्रीय नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्याच्या या यशाबद्दल अभिनंदन…
LPG prices : व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरांनी अवघ्या पाच महिन्यांत दुप्पट उसळी घेतल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग व्यवसायासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पेट्रोल-डिझेलनंतर आता गॅस दरवाढीने महागाईच्या आगीत आणखी तेल ओतले आहे. नव्या दरानुसार, दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ४२ रुपयांची वाढ होऊन तो आता ३,११३.५० रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात सर्वाधिक ५३.५० रुपयांची वाढ झाली असून तेथील दर ३,२५५.५० रुपयांवर पोहोचले आहेत. केवळ मोठ्या सिलेंडरपुरतेच हे संकट मर्यादित नसून, ५ किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही ११ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत हा सिलेंडर आता ८२१.५० रुपयांना मिळणार असून, विद्यार्थी, नोकरदार आणि एकटे राहणाऱ्या नागरिकांच्या…
Rain Alert : अहिल्यानगर : जिल्ह्यावर पुढील चार दिवस अवकाळी संकटाचे सावट असून विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाच्या शक्यतेमुळे हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. नागरिकांसह शेतकऱ्यांनीही सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार ३१ मे ते ३ जूनदरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटा वेळी झाडाखाली, मोकळ्या मैदानात किंवा उंच धातूच्या संरचनांजवळ थांबू नये. वीजेचे खांब, टॉवर, रोहित्र, लोंबकळणाऱ्या केबल्स तसेच विद्युत उपकरणांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात…