Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Census : मिशन जनगणना’ फत्ते; अहिल्यानगर महापालिका राज्यात द्वितीय
अहिल्यानगर

Census : मिशन जनगणना’ फत्ते; अहिल्यानगर महापालिका राज्यात द्वितीय

माहिती संकलन आणि प्रभावी जनसहभागाच्या जोरावर अहिल्यानगर महापालिकेने जनगणना मोहिमेत राज्यात दुसरे मानाचे स्थान मिळविले
Vinayak LandeBy Vinayak LandeJune 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260610 WA0003
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Census : अहिल्यानगर : वेगवान कामकाज, अचूक माहिती संकलन आणि प्रभावी जनसहभागाच्या जोरावर अहिल्यानगर महापालिकेने जनगणना मोहिमेत राज्यात दुसरे मानाचे स्थान मिळविले. विशेष म्हणजे ३० दिवसांचे उद्दिष्ट केवळ २१ दिवसांत पूर्ण करून प्रशासनाने नवा आदर्श निर्माण केला.

भारत सरकारच्या गृह मंत्रालयामार्फत राबविण्यात आलेल्या जनगणना मोहिमेत मिळालेल्या या यशामागे प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर, सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, जनगणना कक्ष प्रमुख राकेश कोतकर, सर्व प्रभाग अधिकारी, ब्रँड अॅम्बेसेडर डॉ. अमोल बागुल, मास्टर ट्रेनर्स, प्रगणक, पर्यवेक्षक तसेच तांत्रिक पथक यांचे समन्वयपूर्ण नेतृत्व आणि अथक परिश्रम मोलाचे ठरले.
या यशाबद्दल आयुक्त यशवंत डांगे यांनी नागरिकांचे आभार मानताना सांगितले की, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांची शिस्तबद्ध कार्यपद्धती यामुळेच मोहिमेला अपेक्षेपेक्षा अधिक गती मिळाली. मोहिमेदरम्यान उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्यात आल्या. तसेच दर चार दिवसांनी आढावा बैठका घेऊन पुढील नियोजन आणि आवश्यक उपाययोजना निश्चित करण्यात आल्या.
अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर यांनी सांगितले की, जनजागृतीसाठी विविध नावीन्यपूर्ण माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात आला. प्रेरणादायी गीते, माहितीपर चित्रफिती, ग्राफिक संदेश, आकाशवाणीवरील मुलाखती, जिंगल्स आणि समाजमाध्यमांद्वारे नागरिक, प्रगणक व पर्यवेक्षकांचे सातत्याने प्रबोधन करण्यात आले. त्यामुळे मोहिमेला व्यापक लोकसहभाग लाभला.
अचूक माहिती संकलन, वेळेचे काटेकोर नियोजन, प्रभावी जनजागृती आणि संघभावनेच्या बळावर अहिल्यानगर महानगरपालिकेने राज्यात मानाचे स्थान मिळविले आहे. ही कामगिरी भविष्यातील प्रशासकीय उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरणारी असून जनगणना कार्यात योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, प्रगणक, पर्यवेक्षक आणि सहायक पथकाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
Administration Ahilyanagar Ayukta Census Mahapalika
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Ahilyanagar Weather Alert : अहिल्यानगरकरांनो सावध रहा; हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी

June 8, 2026

Agriculture Solar pumps : सौरक्रांतीत महाराष्ट्राचा देशात डंका; दहा लाख सौर कृषिपंप कार्यान्वित

June 5, 2026

PM Surya Ghar Yojana : मोफत वीजेच्या दिशेने महाराष्ट्राची झेप; देशात अव्वल कामगिरी

June 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Census : मिशन जनगणना’ फत्ते; अहिल्यानगर महापालिका राज्यात द्वितीय

June 10, 2026

Ahilyanagar Weather Alert : अहिल्यानगरकरांनो सावध रहा; हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी

June 8, 2026

Agriculture Solar pumps : सौरक्रांतीत महाराष्ट्राचा देशात डंका; दहा लाख सौर कृषिपंप कार्यान्वित

June 5, 2026

PM Surya Ghar Yojana : मोफत वीजेच्या दिशेने महाराष्ट्राची झेप; देशात अव्वल कामगिरी

June 2, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.