Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’
अहिल्यानगर

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मोनिका पंडित यांनी केलेल्या सखोल तपासणीत ९ गर्भवती महिला अतिजोखमीच्या (हाय रिस्क) असल्याचे निदान झाले
Vinayak LandeBy Vinayak LandeSeptember 9, 2026Updated:September 9, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260909 WA0011
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : अहिल्यानगर : गर्भवती मातांच्या आरोग्याची वेळेत तपासणी करून संभाव्य धोके टाळण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र देवगाव अंतर्गत उपकेंद्र नागरदेवळे येथे राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानात ३९ गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मोनिका पंडित यांनी केलेल्या सखोल तपासणीत ९ गर्भवती महिला अतिजोखमीच्या (हाय रिस्क) असल्याचे निदान झाले. या महिलांच्या प्रकृतीवर आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’
Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’
माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करून सुरक्षित मातृत्वाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान राबविण्यात येते. त्याअंतर्गत नागरदेवळे येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात गर्भवती महिलांची सर्वसमावेशक तपासणी करण्यात आली. रक्तदाब, गर्भाच्या हृदयाचे ठोके, आवश्यक प्रयोगशाळा चाचण्या आदींची तपासणी करण्यात आली.
गर्भावस्थेत कोणती लक्षणे धोक्याची ठरू शकतात, कोणत्या वेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, सकस व संतुलित आहाराचे महत्त्व, लोह-कॅल्शियमच्या गोळ्यांचे नियमित सेवन तसेच संस्थात्मक प्रसूतीचे महत्त्व याबाबत डॉ. मोनिका पंडित यांनी गर्भवती महिलांना मार्गदर्शन केले. हाय रिस्क मातांची वेळेत ओळख झाल्याने संभाव्य गुंतागुंत टाळण्यासाठी पुढील उपचाराचे नियोजन करणे शक्य झाले.
या अभियानात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद काकडे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल घंगाळे, आरोग्य सहायक भूषण शिंदे, महिला आरोग्य पर्यवेक्षिका सुनीता काळे, आरोग्य सेवक वैष्णव कातोरे, सचिन चितळे, विवेक गुंड, गटप्रवर्तक कल्पना शेंडे, आशासेविका वैष्णवी काटकर वैष्णवी खेतमाळस, मंगल दळवी, वंदना पेहरे, कामिनी खेतमाळस, परिचारिका मार्था कांबळे आदींनी सहभाग घेतला.

दर महिन्याच्या ‘या’ तारखेला मोफत तपासणी

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची सुरुवात ९ जून २०१६ रोजी करण्यात आली. अभियानांतर्गत गर्भावस्थेच्या दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील महिलांना दर महिन्याच्या ९ तारखेला मोफत प्रसूतिपूर्व आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते. ९ तारखेला सार्वजनिक सुट्टी असल्यास पुढील कामकाजाच्या दिवशी हे अभियान राबविले जाते.

शासकीय सुविधांचा लाभ घ्या : डॉ. हरिभाऊ गाढे

गरोदर महिलांनी नियमित तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करावे. सकस व संतुलित आहार घ्यावा आणि कोणतीही गंभीर लक्षणे जाणवल्यास तातडीने जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत उपलब्ध असलेल्या मोफत आरोग्य सुविधांचा गर्भवती महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिभाऊ गाढे यांनी केले.
Ahilyanagar Health Camp Nagardevale Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.