Hospitalization : अहिल्यानगर : आधुनिक जीवनशैलीमुळे आज हॉस्पिटल्स बाराही महिने हाऊसफुल्ल दिसतात. यालाच प्रगती म्हणायचे का, असा आत्मचिंतन करायला लावणारा परखड सवाल वेदमूर्ती चकोर गुरू मुळे यांनी उपस्थित केला. जीवनात सुख-शांती-समाधान मिळवण्यासाठी केवळ भौतिक सुविधांपेक्षा शास्त्रोक्त कर्म, धर्मपरंपरा आणि दैनंदिन सत्कर्म यांना महत्त्व दिले पाहिजे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

येथील सनातन धर्मसभेच्या वतीने आयोजित शारदीय व्याख्यानमालेतील पुष्प ‘कर्मकांड आणि ग्रहशांती’ या विषयावर गुंफताना ते बोलत होते. देवी शारदेच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून व्याख्यानाचा प्रारंभ झाला. वेदमूर्ती उमेश वाळुंजकर आणि वेदमूर्ती बंडोपंत मुळे यांनी पौरोहित्य केले.

