Yellow Alert : अहिल्यानगर : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अहिल्यानगरसह पुणे व नाशिक जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास गोदावरी, भीमा, प्रवरा, घोड व कुकडी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. संबंधित धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढल्यास नदीकाठच्या भागात परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे नदी, ओढे व नाल्यांच्या काठावरील नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरण परिसरात जाणाऱ्या पर्यटकांनाही सावधानतेचा इशारा देण्यात…
Author: Vinayak Lande
Illegal Mawa Production : अहिल्यानगर : पारनेर तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर मावा निर्मितीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत अमन सुलतान तांबोळी (वय १९, रा. भाळवणी, ता. पारनेर) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून एकूण १ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना हॉटेल रुचिराच्या पाठीमागील खोलीत मावा तयार केला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी अमन तांबोळी हा तयार केलेला मावा प्लास्टिकच्या पुड्यांमध्ये भरताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून मावा तयार करण्यासाठी…
Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : अहिल्यानगर : गर्भवती मातांच्या आरोग्याची वेळेत तपासणी करून संभाव्य धोके टाळण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र देवगाव अंतर्गत उपकेंद्र नागरदेवळे येथे राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानात ३९ गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मोनिका पंडित यांनी केलेल्या सखोल तपासणीत ९ गर्भवती महिला अतिजोखमीच्या (हाय रिस्क) असल्याचे निदान झाले. या महिलांच्या प्रकृतीवर आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करून सुरक्षित मातृत्वाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान राबविण्यात येते. त्याअंतर्गत नागरदेवळे येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात गर्भवती महिलांची सर्वसमावेशक तपासणी करण्यात आली. रक्तदाब, गर्भाच्या…
Narmada Purana Katha Chikhli : चिखली : ‘नर्मदे हर हर’च्या जयघोषाने चिखली नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आणि जागृत हनुमान मंदिराचा परिसर नर्मदामाईच्या नामस्मरणाने दुमदुमला. पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेल्या मिलिंद महाराज चवंडके यांच्या अमृतवाणीतून रंगलेल्या सात दिवसीय नर्मदा पुराण कथा सोहळ्याची श्रावणातील तिसऱ्या सोमवारी भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. कथा, भजन आणि सामुदायिक महाआरतीने रंगलेल्या या सोहळ्याने भाविकांना नर्मदामाईच्या भक्तीचा अविस्मरणीय आध्यात्मिक आनंद दिला. नर्मदा पुराणाचे रसाळ निरूपण करताना मिलिंद महाराज चवंडके यांनी ग्रंथातील कथांचे बारकावे, नर्मदा तटाचे आध्यात्मिक महत्त्व आणि पायी नर्मदा परिक्रमेतील अनुभव श्रोत्यांसमोर प्रभावीपणे मांडले. विदर्भातील पहिलाच असा नर्मदा पुराण कथा सोहळा ठरल्याच्या भावना सांगता सोहळ्यात व्यक्त करण्यात…
Narmada Parikrama : चिखली : नर्मदा मातेचे नामस्मरण, जलस्नान आणि पायी परिक्रमा यांचे आध्यात्मिक महत्त्व नर्मदा पुराणचे कथाकार मिलिंद महाराज चवंडके यांनी रसाळपणे उलगडले. परिक्रमेतील अनुभव कथन करताना अनेक भाविक भावविभोर झाले. येथील जागृत हनुमान मंदिराच्या सभामंडपात श्रावण महिन्यानिमित्त प्रथमच आयोजित नर्मदा पुराण कथा निरूपण सोहळ्याचे सहावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. कथा सोहळ्याच्या आयोजक शारदाताई वायाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. हभप ज्योतीताई इंगळे यांनी गायिलेली स्वरचित आरती उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारी ठरली. भगवान शिंगणे व चंद्रकला शिंगणे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. नर्मदेची पायी परिक्रमा करणे म्हणजे आजच्या काळातील कठोर तपश्चर्याच आहे. या परिक्रमेत श्रद्धा, संयम आणि त्यागाची कसोटी लागतेच;…
Narmada Purana : चिखली : अमरकंटकच्या कुशीतून समुद्राला मिळणाऱ्या नर्मदेच्या दोन्ही तटांवर तब्बल ६० कोटी ६० हजार तीर्थे असल्याचा अद्भुत महिमा नर्मदा पुराणातून उलगडला. नर्मदामाईच्या प्रत्येक कणात तीर्थत्व आणि भक्तीची अनुभूती दडली असून, धर्मनिष्ठ भाविकांना या पवित्र तीर्थांचे दर्शन घडू शकते, असे मिलिंद महाराज चवंडके यांनी सांगितले. चिखलीतील जागृत हनुमान मंदिरातील सभामंडपात श्रावण महिन्यानिमित्त प्रथमच आयोजित नर्मदा कथा निरूपण सोहळ्याचे पाचवे पुष्प गुंफताना ते बोलत होते. नर्मदा पुराणातील तीर्थमहिमा, पापक्षालन आणि वृक्षारोपणाचे महत्त्व त्यांनी रसाळपणे श्रोत्यांसमोर मांडले. मिलिंद महाराज चवंडके म्हणाले, “नर्मदा नदीची लांबी शत योजन म्हणजे साधारणतः चारशे कोसांपेक्षा अधिक असून ती अर्धा योजन रुंद विस्तारली आहे. अमरकंटक…
Amarkantak : चिखली : भगवान श्रीशंकराने निर्माण केलेल्या पवित्र अमरकंटक पर्वतावरील नर्मदा तटावर आत्मदर्शनाचे परम सुख अनुभवता येते. नर्मदा तट हा साधना, जप आणि ध्यानासाठी अत्यंत पवित्र असून भाविकांनी या पावन भूमीचा आध्यात्मिक आनंद लुटावा, असे आवाहन नर्मदा पुराणचे कथाकार मिलिंद महाराज चवंडके यांनी केले. चिखली येथील जागृत हनुमान मंदिराच्या सभामंडपात श्रावण महिन्यानिमित्त प्रथमच आयोजित नर्मदा कथा निरूपण सोहळ्यातील चतुर्थ पुष्प गुंफताना ते बोलत होते. मिलिंद महाराज चवंडके म्हणाले, “भगवान श्रीशंकराने अत्यंत पवित्र अशा अमरकंटक पर्वताची निर्मिती केली असून श्रीशंकर पार्वतीसह या पर्वतावर नित्य वास करतात. श्रीमार्कंडेय मुनींनी केवळ नर्मदेचे जलप्राशन करून दहा हजार युगांपर्यंत भगवान श्रीशंकराची आराधना केली. त्यामुळे…
Narmada Mahima : चिखली : कोट्यवधी ऋषींच्या तपश्चर्येने पावन झालेल्या नर्मदामाईच्या महिम्याने चिखलीतील भक्तिरसाला नवी उंची मिळाली. नर्मदा पुराणाच्या तृतीय पुष्पात मिलिंद महाराज चवंडके यांनी नर्मदामाई ही भक्तांच्या मनोरथांची सिद्धिदात्री असल्याची महती उलगडली. जागृत हनुमान मंदिर येथील सभामंडपात श्रावण महिन्यानिमित्त प्रथमच आयोजित नर्मदा कथा निरूपण सोहळ्याचे तृतीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. नर्मदेच्या दोन्ही तीरांवर असंख्य देवमंदिरे, आश्रम आणि पवित्र स्थाने असून, या भूमीवर आजही अनेक साधक विविध प्रकारे तपश्चर्या करीत आहेत. कोणी उग्र तप करतात, कोणी अग्निहोत्र व पंचाग्नी साधना करतात, तर कोणी केवळ जल अथवा वायूचा आहार घेत साधना करतात. अनेक साधक भक्तीमार्गाचा आश्रय घेऊन नर्मदामाईच्या सान्निध्यात आध्यात्मिक…
Narmada Purana Katha : चिखली : श्रावणातील नर्मदा पुराणाच्या भक्तिधारेने चिखलीत अध्यात्माचा सोहळा रंगला. नर्मदा मातेच्या चरित्राचे श्रवण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. “नर्मदा ही केवळ नदी नव्हे, तर जीवांचे पापक्षालन करणारी परमेश्वराची विभूती आहे,” असे सांगत मिलिंद महाराज चवंडके यांनी नर्मदा महिम्याची अनुभूती भाविकांना घडविली. येथील जागृत हनुमान मंदिराच्या सभामंडपात श्रावण महिन्यानिमित्त प्रथमच आयोजित नर्मदा कथा निरूपण सोहळ्याचे द्वितीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. कथा सोहळ्याच्या आयोजक शारदाताई वायाळ यांनी स्वागत केले. ह.भ.प. ज्योतीताई इंगळे यांनी स्वरचित आरती व नामगजर सादर केला. सिद्धेश्वर कपाळे व संध्याताई कपाळे, सुभाष सावके व दुर्गाताई सावके तसेच बाळासाहेब भुतेकर व पुष्पाताई भुतेकर या…
Narmada Purana Katha Nirupan Sohala : चिखली : नर्मदेच्या तीरी नव्हे; चिखलीतील राऊतवाडीतच नर्मदामाईच्या भक्तीची अविरत धारा वाहू लागली. नर्मदा पुराणातील माहात्म्य, नर्मदाष्टकाचा स्वर आणि ‘नर्मदे हर’च्या जयघोषाने जागृत हनुमान मंदिराचा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला; नर्मदा पुराण कथा निरूपण सोहळ्याचा उत्साहात प्रारंभ झाला. नर्मदामाईच्या नामघोषाने चिखलीतील राऊतवाडी भक्तिरसात न्हाऊन निघाली; नर्मदा पुराणाच्या अमृतकथेने भाविक मंत्रमुग्ध झाले. नर्मदामाहात्म्याच्या निरूपणातून परिक्रमेचे रोमांचकारी अनुभव उलगडताच उपस्थित भाविक भारावून गेले. कथा सोहळ्याचे आयोजक सुनीलराव वायाळ व शारदाताई वायाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. हभप ज्योतीताई इंगळे यांनी स्वरचित नामगजर व आरती सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. निलेश इंगळे व सोनल इंगळे या दाम्पत्याच्या हस्ते विधिवत…