Author: Vinayak Lande

Dharmaveer Yuva Pratishthan Cleanliness Drive : अहिल्यानगर : धर्मवीर युवा प्रतिष्ठान, नालेगाव यांच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून अखंड स्वच्छता अभियान राबवले जात आहे. आज प्रतिष्ठानने सलग ३०० व्या रविवारी स्वच्छता अभियानाचा ऐतिहासिक टप्पा गाठत भिंगार येथील बेलेश्वर मंदिर परिसरातून तब्बल पाच ते सहा टन कचरा हटवला. सहा वर्षे एकही रविवार न चुकवता सुरू असलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ‘स्वच्छतेचा हा आदर्श संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे,’ असे गौरवोद्गार महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी काढले. यावेळी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या कार्याचे विशेष कौतुक करत, सहा वर्षे सलग ३०० रविवारी एकही दिवस खंड न पडता…

Read More

Sri Sathya Sai Rath Yatra : अहिल्यानगर : श्री सत्यसाईबाबांच्या दिव्य पादुकांसह आलेल्या प्रेमवाहिनी रथयात्रेचे शहरात जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. जिल्ह्याच्या वतीने काष्टी येथे स्वागत झाल्यानंतर कायनेटिक चौकापासून मोटारसायकल व सायकल रॅलीसह रथ नगरमध्ये दाखल झाला. सक्कर चौकात रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. श्री सत्यसाईबाबांच्या जयघोषात निघालेल्या शोभायात्रेत घोडेस्वार, तुतारी, बँड पथक, महिला लेझीम, वारकरी विद्यार्थी, बालविकासचा बालचमू आणि शेकडो साईभक्त सहभागी झाले. नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. रथामधील दिव्य पादुकांचे वेदमंत्रांच्या घोषात विधिवत पूजन करण्यात आले. वेदमूर्ती उमेश वाळुंजकर यांनी पौरोहित्य केले. विविध धर्मगुरूंनी सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना केली. वेदसार पठण, अथर्वशीर्ष, भजन आणि विविध…

Read More

Yellow Alert : अहिल्यानगर : भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ३ व ४ जुलै रोजी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले की शेतकऱ्यांनी शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला किंवा आणण्याचे नियोजन असलेला माल पावसापासून सुरक्षित ठेवावा. जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे. नागरिक, शेतकरी बांधव यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. प्रशासनाच्या खबरदारीच्या सूचना -मेघगर्जना व…

Read More

Illegal Gutkha Seized : अहिल्यानगर : अलिशान कारमधून सुरू असलेल्या प्रतिबंधित गुटख्याच्या काळ्या धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेने श्रीगोंद्यात धडक कारवाई करत तब्बल २८ लाख ८८ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून चार फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २९ जून रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे मुंढेकरवाडी येथे छापा टाकला. त्यावेळी एका घराजवळ उभ्या असलेल्या आलिशान कारमधून दुसऱ्या कारमध्ये गुटख्याच्या गोण्या भरताना तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमोल…

Read More

Pandharpur Wari Health Camp : अहिल्यानगर : आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांच्या आरोग्यरक्षणासाठी राज्य यंत्रणा सज्ज झाली असून, ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ या संकल्पनेतून ‘चरण सेवा’ उपक्रमाला प्रारंभ झाला आहे. पालखी मार्गावरील ४०० ठिकाणी १२ हजारांहून अधिक वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अकोला, जालना, बीड, नांदेड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या ११ जिल्ह्यांतील जिल्हा प्रशासन, शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये, विविध आरोग्य संस्था, सेवाभावी संघटना आणि स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत…

Read More

Pulse Polio Vaccination Campaign : अहिल्यानगर : पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नागरदेवळे येथे रविवारी (ता. २८) उत्साहपूर्ण वातावरणात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जिल्हा परिषद शाळेत सरपंच राम पानमळकर यांच्या हस्ते बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. सकाळपासूनच पालकांनी आपल्या पाल्यांना लस देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. या वेळी पालकांना नियमित लसीकरणासोबतच प्रत्येक राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत आपल्या बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजण्याचे…

Read More

Illegal Gambling Raid Ahilyanagar : अहिल्यानगर : जिल्ह्यातील अवैध जुगार व्यवसायाविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबवत श्रीरामपूर, कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ८ जुगार अड्ड्यांवर एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत १ लाख ६५ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ०८ गुन्हे दाखल झाल्याने अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी २२ जून रोजी विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करून अवैध जुगार व्यवसायावर मोठा आघात केला. पोलीस ठाण्यानिहाय कारवाई – श्रीरामपूर : ६ गुन्हे, १,६१,८८०…

Read More

Ahilyanagar Yellow Alert : अहिल्यानगर : भारतीय हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २२ ते २६ जूनदरम्यान ‘येलो अलर्ट’ जारी केला असून या कालावधीत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संभाव्य आपत्ती आणि जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. हवामानातील बदलामुळे मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे यांचा धोका वाढला असून नागरिकांनी झाडाखाली, मोकळ्या मैदानात किंवा उघड्या जागेत थांबणे टाळावे. तसेच जनावरांना सुरक्षित आश्रयस्थळी हलवावे. धरण, नदी आणि कालव्यांच्या परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. पाण्यात उतरणे किंवा धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे टाळावे, असेही प्रशासनाने…

Read More

International Yoga Day 2026 : अहिल्यानगर : नगर तालुक्यातील नागरदेवळे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (२१ जून) जागतिक योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नागरदेवळे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवक तसेच नागरिकांनी सहभाग घेत विविध योगासने व प्राणायामाचा सराव केला. योग दिनाच्या कार्यक्रमात सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. विशाल घंगाळे, ग्रामपंचायत अधिकारी नेताजी भाबड, आरोग्य सेवक सचिन चितळे, गटप्रवर्तक कांचन शेंडे, आशासेविका कामिनी खेतमाळीस, अश्विनी खेतमाळीस, रजिया शेख, आशा धाडगे, वृषाली धाडगे, सुनीता कड आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी विविध योगासने आणि प्राणायाम करून निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. योगामुळे शारीरिक, मानसिक,…

Read More

NEET Re-Exam 2026 : अहिल्यानगर : राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत (NTA) रविवार (ता. २१ जून २०२६ ) रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात नीट (NEET-2026) पुनर्परीक्षा आयोजित करण्यात आली असून, जिल्ह्यातील १२ परीक्षा केंद्रांवर एकूण ५ हजार ३८५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत होणार असून, दिव्यांग प्रवर्गातील पात्र उमेदवारांसाठी परीक्षा सायंकाळी ६.२० वाजेपर्यंत चालणार आहे. परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था यांनी व्यापक तयारी केली आहे. परीक्षा व्यवस्थापनासाठी १२ केंद्र अधीक्षक, १६ उपकेंद्र अधीक्षक, १६ निरीक्षक, २२५ कक्ष निरीक्षक, ३ एनटीए प्रतिनिधी व भरारी पथके, १२…

Read More