Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Crime : अहिल्यानगर हादरलं; पुतण्याचा खून करून घर साफ; २४ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश
अहिल्यानगर

Crime : अहिल्यानगर हादरलं; पुतण्याचा खून करून घर साफ; २४ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश

पारनेर तालुक्यातील भांडगाव येथे खून करून १२ लाख ७० हजार रुपयांची जबरी चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत अटक करून गुन्हा उघडकीस आणला.
Vinayak LandeBy Vinayak LandeMay 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260517 WA0018
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Crime : अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील भांडगाव येथे खून करून १२ लाख ७० हजार रुपयांची जबरी चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत अटक करून गुन्हा उघडकीस आणला. आरोपीकडून रोख रक्कम, मोबाईल व दुचाकीसह एकूण १० लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पारनेर पोलीस ठाण्यात कलम १०३ (१), ३०९(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

https://jansattatimes.com/wp-content/uploads/2026/05/VID-20260517-WA0019.mp4
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी सिद्धेश संदीप खरमाळे (रा. भुजवळवस्ती, भांडगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या वडिलांवर अज्ञात इसमाने चोरीच्या उद्देशाने डोक्यात हत्याराने मारहाण करून त्यांना ठार केले व घरातील १२ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून गुप्त माहितीच्या आधारे तपास करत आरोपीची ओळख पटवली. महेश हनुमंत खरमाळे (वय ४५, रा. भुजवळवस्ती, भांडगाव) हा आरोपी भांडगाव ते जामगाव रस्त्यावर लाल-काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर मागे बॉक्स बांधून जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तळ्याजवळ सापळा रचण्यात आला. संशयित दिसताच त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी महेश खरमाळे याने १५ मे २०२६ रोजी पहाटे आपल्या पुतण्या संदीप भास्कर खरमाळे याच्या घरी जाऊन हातोड्याने डोक्यात वार करून त्याला ठार मारल्याचे व घरातील रोख रक्कम चोरून नेल्याचे कबूल केले. पोलिसांनी आरोपीकडून १० लाख 84 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पारनेर पोलीस ठाणे करीत आहे.
Ahilyanagar Bhandgoan Crime Murder Parner Police
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Bakri Eid २०२६ : ‘बकरी ईद’चा सण उत्साहात पण नियमांच्या चौकटीतच; जिल्हाधिकाऱ्यांचा स्पष्ट इशारा

May 22, 2026

Cheque Bounce : चेक बाऊन्स प्रकरणी कठोर निकाल; महिलेला तुरुंगवास, लाखोंची नुकसानभरपाई

May 20, 2026

Ahilyanagar News : एलसीबीचा स्ट्राईक; बार-दुकान फोडणारी टोळी जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Bakri Eid २०२६ : ‘बकरी ईद’चा सण उत्साहात पण नियमांच्या चौकटीतच; जिल्हाधिकाऱ्यांचा स्पष्ट इशारा

May 22, 2026

Cheque Bounce : चेक बाऊन्स प्रकरणी कठोर निकाल; महिलेला तुरुंगवास, लाखोंची नुकसानभरपाई

May 20, 2026

Crime : अहिल्यानगर हादरलं; पुतण्याचा खून करून घर साफ; २४ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश

May 17, 2026

Ahilyanagar News : एलसीबीचा स्ट्राईक; बार-दुकान फोडणारी टोळी जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.