Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Bakri Eid २०२६ : ‘बकरी ईद’चा सण उत्साहात पण नियमांच्या चौकटीतच; जिल्हाधिकाऱ्यांचा स्पष्ट इशारा
अहिल्यानगर

Bakri Eid २०२६ : ‘बकरी ईद’चा सण उत्साहात पण नियमांच्या चौकटीतच; जिल्हाधिकाऱ्यांचा स्पष्ट इशारा

बकरी ईद'च्या पार्श्वभूमीवर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असून शांतता, स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यावर भर देण्यात आला आहे.
Vinayak LandeBy Vinayak LandeMay 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260522 WA0007
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Bakri Eid २०२६ : ‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असून शांतता, स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यावर भर देण्यात आला आहे. नियमभंग, विनापरवाना वाहतूक आणि अनधिकृत कत्तलीवर कठोर कारवाईचा इशारा देत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले.

Bakri Eid २०२६ : 'बकरी ईद'चा सण उत्साहात पण नियमांच्या चौकटीतच; जिल्हाधिकाऱ्यांचा स्पष्ट इशारा
Bakri Eid २०२६ : ‘बकरी ईद’चा सण उत्साहात पण नियमांच्या चौकटीतच; जिल्हाधिकाऱ्यांचा स्पष्ट इशारा
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समिती व प्राणी क्लेश प्रतिबंधक जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त उमेश पाटील, सहायक आयुक्त डॉ. मुकुंद राजळे, अन्न व औषध निरीक्षक जी. बी. भोर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Bakri Eid २०२६ : 'बकरी ईद'चा सण उत्साहात पण नियमांच्या चौकटीतच; जिल्हाधिकाऱ्यांचा स्पष्ट इशारा
Bakri Eid २०२६ : ‘बकरी ईद’चा सण उत्साहात पण नियमांच्या चौकटीतच; जिल्हाधिकाऱ्यांचा स्पष्ट इशारा
डॉ. आशिया म्हणाले, “सण उत्साहात साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही, याची विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्राण्यांच्या वाहतुकीदरम्यान तसेच कत्तलीच्या प्रक्रियेत प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्ष राहावे. विनापरवाना जनावरांची वाहतूक, सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत कत्तल आणि अस्वच्छता आढळल्यास संयुक्त कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
काही तालुक्यांत तात्पुरत्या कत्तलखान्यांची मागणी होण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक परवानग्या, स्वच्छता आणि नियमांचे पालन याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या.
कत्तलखाने व अन्य ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ ठेवावा. नागरिकांच्या धार्मिक भावना, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखत प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

 

Administration Ahilyanagar Bakri Eid Jilhadhikari Police
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Cheque Bounce : चेक बाऊन्स प्रकरणी कठोर निकाल; महिलेला तुरुंगवास, लाखोंची नुकसानभरपाई

May 20, 2026

Crime : अहिल्यानगर हादरलं; पुतण्याचा खून करून घर साफ; २४ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश

May 17, 2026

Ahilyanagar News : एलसीबीचा स्ट्राईक; बार-दुकान फोडणारी टोळी जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Bakri Eid २०२६ : ‘बकरी ईद’चा सण उत्साहात पण नियमांच्या चौकटीतच; जिल्हाधिकाऱ्यांचा स्पष्ट इशारा

May 22, 2026

Cheque Bounce : चेक बाऊन्स प्रकरणी कठोर निकाल; महिलेला तुरुंगवास, लाखोंची नुकसानभरपाई

May 20, 2026

Crime : अहिल्यानगर हादरलं; पुतण्याचा खून करून घर साफ; २४ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश

May 17, 2026

Ahilyanagar News : एलसीबीचा स्ट्राईक; बार-दुकान फोडणारी टोळी जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.