Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार
अहिल्यानगर

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

महाअन्नदानासाठी आवश्यक शिधा पुरविण्याची सेवा ही केवळ अन्नदान नसून अलौकिक समष्टी साधनाच आहे.
Vinayak LandeBy Vinayak LandeJuly 24, 2026Updated:July 24, 2026No Comments3 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260724 WA0003
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Ashadhi Wari Seva : अहिल्यानगर : आषाढी वारीच्या मार्गावर पंढरपूरपर्यंत पोहोचून वारकऱ्यांना महाअन्नदानासाठी आवश्यक शिधा पुरविण्याची सेवा ही केवळ अन्नदान नसून अलौकिक समष्टी साधनाच आहे. ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता गेल्या २१ वर्षांपासून मिलिंद महाराज चवंडके यांच्याकडून सुरू असलेली ही निरपेक्ष सेवा वाखाणण्याजोगी आहे, असे गौरवोद्गार श्री संत मुक्ताबाई पालखीचे प्रमुख मंगेश महाराज जळगांवकर यांनी काढले.

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार
Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार
आपल्या शहरात, परिसरात, कॉलनीत, गावात किंवा वस्तीवर आषाढी वारीला निघालेली दिंडी आली की अन्नदानासाठी अनेक हात पुढे येतात. मात्र, वारी मार्गावर पंढरपूरपर्यंत एकदा नव्हे, तर चार-पाच वेळा जाऊन वारकऱ्यांना भोजनासाठी आवश्यक शिधा पोहोचविण्याची सेवा करणारे मिलिंद महाराज चवंडके हे आषाढी वारीच्या इतिहासातील एकमेव सेवेकरी असल्याचे म्हणावे लागेल. मार्गस्थ वारकऱ्यांना भोजनासाठी शिधा कमी पडू नये, यासाठी ते ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता वारी मार्गावर आपलेपणाने संपर्क साधत सेवा बजावत आहेत.
या सेवेत अन्नदानाची इच्छा असलेल्या सर्व भाविकांना सहभागी करून घेऊन खऱ्या अर्थाने सामाजिक समरसता आणि एकात्मता साधली जात आहे. केवळ शिधा पुरविण्यापुरती ही सेवा मर्यादित नसून, थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांना आयुर्वेदिक तेलाने मालिश करणे, प्रथमोपचाराचे साहित्य उपलब्ध करून देणे तसेच थंडी, ताप, जुलाब आणि अंगदुखीवरील औषधांची व्यवस्था करणे, अशी व्यापक सेवा केली जाते. वारकऱ्यांमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेत सेवा करण्याचा आनंद अनुभवत, सर्वव्यापी ईश्वराशी एकरूप होता येते, हे मिलिंद महाराज चवंडके यांच्या सेवेतून दिसून येते.
Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार
Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार
अध्यात्मिक पत्रकारितेसाठी जीवन समर्पित केलेले मिलिंद महाराज चवंडके हे फोटो किंवा प्रसिद्धीच्या अपेक्षेने नव्हे, तर तळमळीने समष्टी साधना करीत आहेत. त्यामुळे जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर कायम झळकत असते, अशा शब्दांत मंगेश महाराज जळगांवकर यांनी त्यांच्या निरपेक्ष सेवेचे कौतुक केले.
Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार
Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार
आषाढी वारी महाअन्नदान सेवेत सहभागी झालेल्या सर्व भाविकांची सेवा विठुरायाच्या चरणी समर्पित करताना, पुढील वर्षीही अशीच व्यापक सेवा घडू दे, अशी प्रार्थना मिलिंद महाराज चवंडके यांनी केली. तसेच वारीच्या या व्यापक सेवेसाठी सहाय्य करणाऱ्या सर्व भाविकांवर विठ्ठलाची कृपादृष्टी राहावी, अशी मागणीही त्यांनी विठ्ठलाच्या चरणी केली.
Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार
Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

महाअन्नदान सेवेत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

यावर्षीच्या आषाढी वारी महाअन्नदान सेवेसाठी निळकंठ महाराज देशमुख, प्रवीण सोनी, अशोक कुरापाटी, नंदलाल मणियार, प्रमोद (पिटू) गांधी, संजय गेनाप्पा, महादन नामदे, विनायक लांडे, रघुनाथ ठोंबरे, डॉ. रोहित ढाकेफळकर, डॉ. सौ. पूर्वा ढाकेफळकर, डॉ. राजश्री वर्मा, वैद्य अनिकेत घोटणकर, सौ. चारूता मिस्किन, रेखाताई डोंगरे, भाग्यलक्ष्मी भट, प्रा. ज्योती कुलकर्णी, प्रकाश चंगेडिया, अनिल सोले, श्रीपाद शिंदीकर, सौरभ बोरूडे, पुरुषोत्तम सुपेकर, संदीप सुपेकर, अजिंक्य सुपेकर आणि देविदास जोग, सोन्याबापू मुदळ यांनी सहकार्य केले. तसेच शरयू ताडपत्रीकर यांच्या स्मरणार्थ श्रीराम ताडपत्रीकर, शैलजा ताडपत्रीकर आणि निर्मला नाईक यांनीही या सेवेसाठी सहाय्य केले.
Ashadhi Wari Seva AshadhiEkadashi MahannadanSeva Pandharpur Pandharpur wari Spirituality Vitthal
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.