Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर संदेश कार्लेंची वर्णी
अहिल्यानगर

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर संदेश कार्लेंची वर्णी

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नगर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती संदेश कार्ले यांची अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.
Vinayak LandeBy Vinayak LandeJuly 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260711 WA0015
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

District Planning Committee : अहिल्यानगर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नगर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती संदेश कार्ले यांची अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे नगर तालुक्यात शिंदे शिवसेनेला मोठी बळकटी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

खंडाळा येथील रहिवासी असलेले संदेश कार्ले यांनी शिवसेनेतूनच राजकीय कारकीर्द सुरू केली. ते दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिले असून नगर पंचायत समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. घोसपुरी पाणीपुरवठा योजनेचे तब्बल दहा वर्षे अध्यक्ष म्हणून कार्य करताना त्यांनी तोट्यातील योजना सुमारे दोन कोटी रुपयांच्या नफ्यात आणत राज्यपातळीवर ठसा उमटविला.
ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख व उपजिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी नगर तालुक्यात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी गावोगावी शाखा स्थापन केल्या. गेल्या वर्षी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे.
या नियुक्तीनंतर भाजपचे युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. नगर तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते, माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचे मजबूत संघटन कार्ले यांच्या पाठीशी असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीतील बंडखोरी ठरली चर्चेचा विषय

गत विधानसभा निवडणुकीत पारनेर-नगर मतदारसंघातून संदेश कार्ले यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून सुमारे ११ हजारांहून अधिक मते मिळविली होती. या मतविभाजनाचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांना बसल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांचा विजय झाला होता. त्यामुळे भविष्यात नगर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये कार्ले यांचे महत्त्व अधिक वाढल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Ahilyanagar District Planning Committee Eknath Shinde Sandesh karle Sujay Vikhe
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026

Nagardevle : निरोगी आई, सुदृढ बाळाचा मंत्र; नागरदेवळेत सुरक्षित मातृत्व अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर संदेश कार्लेंची वर्णी

July 11, 2026

Nagardevle : निरोगी आई, सुदृढ बाळाचा मंत्र; नागरदेवळेत सुरक्षित मातृत्व अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

July 9, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.