Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Ahilyanagar Weather Alert : अहिल्यानगरकरांनो सावध रहा; हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी
अहिल्यानगर

Ahilyanagar Weather Alert : अहिल्यानगरकरांनो सावध रहा; हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी

भारतीय हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ८ ते ९ जूनदरम्यान 'येलो अलर्ट' जारी केला आहे.
Vinayak LandeBy Vinayak LandeJune 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260608 WA0011
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Ahilyanagar Weather Alert : अहिल्यानगर जिल्ह्यावर पुढील दोन दिवस वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा धोका कायम राहणार असून हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Ahilyanagar Weather Alert : अहिल्यानगरकरांनो सावध रहा; हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी
Ahilyanagar Weather Alert : अहिल्यानगरकरांनो सावध रहा; हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी
भारतीय हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ८ ते ९ जूनदरम्यान ‘येलो अलर्ट’ जारी केला असून जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस तसेच विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता असून वीज पडण्याच्या घटनांचा धोका लक्षात घेता नागरिकांनी झाडाखाली, वीजवाहिन्यांजवळ, ट्रान्सफॉर्मर, मोबाईल टॉवर, होर्डिंग्ज तसेच मोकळ्या मैदानात थांबणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मेघगर्जना सुरू असताना विद्युत उपकरणांचा वापर टाळावा, धातूच्या वस्तूंपासून दूर राहावे आणि सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. वीजेच्या इशाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या ‘दामिनी’ अॅपचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, धरण, नदी व कालव्यांमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. पाण्याच्या प्रवाहात उतरणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे टाळावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
वादळी वारे, पाऊस व संभाव्य गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच जनावरांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी १०७७ (टोल फ्री) या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Administration Ahilyanagar Weather Alert Farmer IMD Rain
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर संदेश कार्लेंची वर्णी

July 11, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.