Author: Vinayak Lande

FFS Digital Fertilizer Distribution System : अहिल्यानगर : खतासाठी आता शेतकऱ्यांना दुकानांच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. ‘एफएफएस’ डिजिटल प्रणालीमुळे मोबाईलवरच खताचा उपलब्ध साठा पाहून पसंतीचे केंद्र निवडता येणार असून, आवश्यक खताचे आरक्षणही करता येणार आहे. शेतकऱ्यांना आवश्यक ते खत पारदर्शक व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ‘Framework for Fertilizer Sale (FFS)’ डिजिटल प्रणालीची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. प्रणालीच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची विशेष आढावा बैठक झाली. यावेळी खत नियोजन, ‘FFS’ ॲपची कार्यपद्धती आणि तंत्रज्ञानाधारित पारदर्शक खत वितरण व्यवस्था याबाबत सविस्तर चर्चा…

Read More

Nagardevale : अहिल्यानगर : माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करून ते शून्यावर आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर आज नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे अभियानांतर्गत गरोदर महिलांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात आली. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नीता सोनार यांनी केलेल्या तपासणीत ४५ गरोदर महिलांपैकी तीन महिला (हाय रिस्क) गर्भधारणेच्या असल्याचे निदान झाले. संबंधित महिलांच्या आरोग्यावर आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात आले असून, त्यांना मोफत उपचार व आवश्यक मार्गदर्शन दिले जात आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.  नागरदेवळे येथील आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या अभियानात गरोदर मातांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. गर्भावस्थेदरम्यान घ्यावयाची काळजी, संतुलित…

Read More

Hindu Janajagruti Samiti : अहिल्यानगर : “हिंदूंचा हिंदुस्थान हिंदू राष्ट्र होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. राष्ट्र आणि धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंनी संघटित राहून धर्माचरण करणे, ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन नाथ संप्रदायाचे संशोधक व प्रवचनकार मिलिंद महाराज चवंडके यांनी केले. हिंदू जनजागृती समितीतर्फे नेप्ती नाका येथील मार्कंडेय संकुलात आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात गुरूपूजन, सामूहिक नामजप आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाच्या वाचनाने झाली. यावेळी बोलताना मिलिंद महाराज चवंडके म्हणाले की, १९९० च्या दशकापासून डॉ. जयंत आठवले यांनी हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला नवे बळ दिले. भविष्यातील हिंदू राष्ट्र हे राष्ट्रभक्त, सात्त्विक समाज आणि सात्त्विक…

Read More

Sadguru Nashikkar Maharaj : अहिल्यानगर : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त नेवासा तालुक्यातील अंतरवाली येथे आज बुधवारी भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. सद्गुरु नाशिककर महाराजांच्या दर्शनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध भागांतून अनेक भाविकांनी अंतरवालीत हजेरी लावत परिसर अक्षरशः भक्तिमय करून टाकला. गेल्या दोन दिवसांपासूनच भाविकांचे अंतरवालीकडे आगमन सुरू झाले होते. पहाटेपासूनच दर्शन सुरू झाली होते. ‘जय गुरुदेव’च्या अखंड जयघोषाने आणि नामस्मरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी सद्गुरु नाशिककर महाराजांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेत गुरुपौर्णिमेचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला. गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी अंतरवाली येथे मोठ्या…

Read More

Ashadhi Wari Seva : अहिल्यानगर : आषाढी वारीच्या मार्गावर पंढरपूरपर्यंत पोहोचून वारकऱ्यांना महाअन्नदानासाठी आवश्यक शिधा पुरविण्याची सेवा ही केवळ अन्नदान नसून अलौकिक समष्टी साधनाच आहे. ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता गेल्या २१ वर्षांपासून मिलिंद महाराज चवंडके यांच्याकडून सुरू असलेली ही निरपेक्ष सेवा वाखाणण्याजोगी आहे, असे गौरवोद्गार श्री संत मुक्ताबाई पालखीचे प्रमुख मंगेश महाराज जळगांवकर यांनी काढले. आपल्या शहरात, परिसरात, कॉलनीत, गावात किंवा वस्तीवर आषाढी वारीला निघालेली दिंडी आली की अन्नदानासाठी अनेक हात पुढे येतात. मात्र, वारी मार्गावर पंढरपूरपर्यंत एकदा नव्हे, तर चार-पाच वेळा जाऊन वारकऱ्यांना भोजनासाठी आवश्यक शिधा पोहोचविण्याची सेवा करणारे मिलिंद महाराज चवंडके हे आषाढी वारीच्या इतिहासातील…

Read More

Shishu Sangopan Sanstha Dindi : अहिल्यानगर : विठ्ठलनामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि वारकरी वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा उत्साह… या भक्तिमय वातावरणात शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी अहिल्यानगर शहरातून दिमाखात निघाली. दिंडीचे शहरभर नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत करत विद्यार्थ्यांच्या संस्कार, भक्ती आणि सामाजिक ऐक्याच्या संदेशाला भरभरून दाद दिली. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोदिया प्रशाला, श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल व संलग्न महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य दिंडी सोहळ्याने अहिल्यानगर शहर भक्तिमय झाले. बालवाडीपासून इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी होत विठ्ठलनामाचा गजर, अभंग आणि टाळ-मृदंगाच्या साथीने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण केले. सविता…

Read More

Radhakrishna Vikhe Patil : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासाला गती मिळाली असून, शेतकरी कल्याण, सिंचन, पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात राज्याने उल्लेखनीय प्रगती केली आहे. शेतकऱ्यांसाठी ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान तसेच कृषी पंपांच्या थकीत वीजबिलांची माफी असे ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतले आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शिर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रवरानगर येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री डॉ. विखे…

Read More

District Planning Committee : अहिल्यानगर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नगर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती संदेश कार्ले यांची अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे नगर तालुक्यात शिंदे शिवसेनेला मोठी बळकटी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. खंडाळा येथील रहिवासी असलेले संदेश कार्ले यांनी शिवसेनेतूनच राजकीय कारकीर्द सुरू केली. ते दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिले असून नगर पंचायत समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. घोसपुरी पाणीपुरवठा योजनेचे तब्बल…

Read More

Nagardevle : अहिल्यानगर : प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत नागरदेवळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे गरोदर मातांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या उपक्रमात सरस्वती हॉस्पिटलचे डॉ. अमोल जाधव यांनी गरोदर मातांची सखोल आरोग्य तपासणी करून गर्भावस्थेदरम्यान घ्यावयाची काळजी, संतुलित आहार, नियमित तपासणीचे महत्त्व तसेच सुरक्षित प्रसूतीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल घंगाळे, आरोग्य सेवक विवेक गुंड, प्रशांत लोंढे, सहायक परिचारिका स्मिता गायकवाड तसेच आशासेविका सोनाली धाडगे, कामिनी खेतमाळस, राझिया शेख, आशा धाडगे, मंगल दळवी, वैष्णवी काटकर आदी उपस्थित होत्या. उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांनी गरोदर महिलांना नियमित तपासणी, लसीकरण, योग्य आहार व आरोग्यविषयक सल्ल्याचे महत्त्व पटवून देत अभियान…

Read More

Sunday Cleanliness Campaign : अहिल्यानगर : धर्मवीर युवा प्रतिष्ठान, नालेगाव यांच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून अखंड स्वच्छता अभियान राबवले जात आहे. आज प्रतिष्ठानने सलग ३०० व्या रविवारी स्वच्छता अभियानाचा ऐतिहासिक टप्पा गाठत भिंगार येथील बेलेश्वर मंदिर परिसरातून तब्बल पाच ते सहा टन कचरा हटवला. सहा वर्षे एकही रविवार न चुकवता सुरू असलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ‘स्वच्छतेचा हा आदर्श संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे,’ असे गौरवोद्गार महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी काढले. यावेळी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या कार्याचे विशेष कौतुक करत, सहा वर्षे सलग ३०० रविवारी एकही दिवस खंड न पडता शहरातील मंदिरे,…

Read More