Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»NEET Re-Exam 2026 : वैद्यकीय प्रवेशाच्या स्वप्नांची उद्या कसोटी; अहिल्यानगरात नीट पुनर्परीक्षा
अहिल्यानगर

NEET Re-Exam 2026 : वैद्यकीय प्रवेशाच्या स्वप्नांची उद्या कसोटी; अहिल्यानगरात नीट पुनर्परीक्षा

अहिल्यानगर जिल्ह्यात नीट (NEET-2026) पुनर्परीक्षा आयोजित करण्यात आली असून, जिल्ह्यातील १२ परीक्षा केंद्रांवर एकूण ५ हजार ३८५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
Vinayak LandeBy Vinayak LandeJune 20, 2026Updated:June 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260620 WA0012
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

NEET Re-Exam 2026 : अहिल्यानगर : राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत (NTA) रविवार (ता. २१ जून २०२६ ) रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात नीट (NEET-2026) पुनर्परीक्षा आयोजित करण्यात आली असून, जिल्ह्यातील १२ परीक्षा केंद्रांवर एकूण ५ हजार ३८५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत होणार असून, दिव्यांग प्रवर्गातील पात्र उमेदवारांसाठी परीक्षा सायंकाळी ६.२० वाजेपर्यंत चालणार आहे.

NEET Re-Exam 2026
NEET Re-Exam 2026
परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था यांनी व्यापक तयारी केली आहे. परीक्षा व्यवस्थापनासाठी १२ केंद्र अधीक्षक, १६ उपकेंद्र अधीक्षक, १६ निरीक्षक, २२५ कक्ष निरीक्षक, ३ एनटीए प्रतिनिधी व भरारी पथके, १२ कर्तव्य दंडाधिकारी, १०७ पोलीस कर्मचारी तसेच जिल्हा प्रशासनाचे २१ अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षा केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, भरारी पथके आणि कर्तव्य दंडाधिकारी यांच्यामार्फत सातत्याने देखरेख केली जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परीक्षा केंद्र परिसरात आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.
प्रवेशपत्रावरील सूचनांचे काटेकोर पालन करून उमेदवारांनी वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ उपकरणे, इअरफोन, कॅल्क्युलेटर, पेन ड्राइव्ह, पुस्तके, नोट्स, पर्स, हँडबॅग तसेच कोणतेही इलेक्ट्रॉनिक अथवा गैरप्रकारास सहाय्यक साहित्य परीक्षा केंद्रात आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
परीक्षा शांततापूर्ण आणि सुरळीत वातावरणात पार पडण्यासाठी उमेदवार, पालक आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नीट पुनर्परीक्षा एका नजरेत

परीक्षा केंद्रे : १२
एकूण विद्यार्थी : ५,३८५
परीक्षा वेळ : दुपारी २ ते ५.१५
दिव्यांग उमेदवारांसाठी : सायं. ६.२० पर्यंत
कक्ष निरीक्षक : २२५
पोलीस कर्मचारी : १०७
भरारी पथके : ३
कर्तव्य दंडाधिकारी : १२
Administration Ahilyanagar Education News Exam Update NEET Re-Exam 2026
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.