International Yoga Day 2026 : अहिल्यानगर : नगर तालुक्यातील नागरदेवळे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (२१ जून) जागतिक योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नागरदेवळे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवक तसेच नागरिकांनी सहभाग घेत विविध योगासने व प्राणायामाचा सराव केला.

