Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !
महाराष्ट्र

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेल्या मिलिंद महाराज चवंडके यांच्या अमृतवाणीतून रंगलेल्या सात दिवसीय नर्मदा पुराण कथा सोहळ्याची श्रावणातील तिसऱ्या सोमवारी भावपूर्ण वातावरणात सांगता झाली.
Vinayak LandeBy Vinayak LandeSeptember 1, 2026No Comments3 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260901 WA0015
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Narmada Purana Katha Chikhli : चिखली : ‘नर्मदे हर हर’च्या जयघोषाने चिखली नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आणि जागृत हनुमान मंदिराचा परिसर नर्मदामाईच्या नामस्मरणाने दुमदुमला. पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेल्या मिलिंद महाराज चवंडके यांच्या अमृतवाणीतून रंगलेल्या सात दिवसीय नर्मदा पुराण कथा सोहळ्याची श्रावणातील तिसऱ्या सोमवारी भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. कथा, भजन आणि सामुदायिक महाआरतीने रंगलेल्या या सोहळ्याने भाविकांना नर्मदामाईच्या भक्तीचा अविस्मरणीय आध्यात्मिक आनंद दिला.

नर्मदा पुराणाचे रसाळ निरूपण करताना मिलिंद महाराज चवंडके यांनी ग्रंथातील कथांचे बारकावे, नर्मदा तटाचे आध्यात्मिक महत्त्व आणि पायी नर्मदा परिक्रमेतील अनुभव श्रोत्यांसमोर प्रभावीपणे मांडले. विदर्भातील पहिलाच असा नर्मदा पुराण कथा सोहळा ठरल्याच्या भावना सांगता सोहळ्यात व्यक्त करण्यात आल्या. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी या कथा सोहळ्याची सांगता होण्याचा योग भाविकांसाठी विशेष पर्वणी ठरला.
नर्मदा पुराणाच्या सातव्या व समारोपाच्या पुष्पात मिलिंद महाराज चवंडके यांनी नर्मदेच्या दोन्ही तटांवरील तीर्थांचे दर्शन, स्नान, पूजन, उपवास, जप व ध्यानाचे महत्त्व विशद केले. श्री मार्कंडेय ऋषींनी नर्मदा पुराणात सांगितलेल्या विविध धार्मिक विधींचा संदर्भ देत पितरांच्या मुक्तीसाठी तर्पणाचे महत्त्व आणि दानधर्माचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.
‘नर्मदा पुराण आजच्या काळात नर्मदेच्या दिव्यत्वाची अनुभूती करून देणारा ग्रंथ आहे. त्यातील प्रत्येक अध्याय भक्तांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारा आहे,’ असे मिलिंद महाराज चवंडके यांनी सांगितले.
पायी नर्मदा परिक्रमेतील अनुभव त्यांनी अत्यंत ओघवत्या आणि भावस्पर्शी शैलीत कथन केले. त्यांचे अनुभव ऐकताना अनेक भाविकांचे डोळे पाणावले. त्यांच्या निरूपणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. विनायक लांडे, साहेबराव आहेर, दिगंबर आहेर व बंकटसिंग शिहरे यांनी भावपूर्ण स्वरात नर्मदेची आरती सादर करून ठेक्यात भजन गायले. भजनाच्या तालावर उपस्थित भाविकांनीही उत्स्फूर्तपणे ताल धरत भक्तिरसाचा आनंद लुटला.
Narmada Purana Katha Chikhli : 'नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !
Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

भाविकांचा सन्मान; सामुदायिक महाआरतीने वातावरण भक्तिमय

कथा सोहळ्याच्या आयोजक शारदाताई वायाळ यांनी स्वागत केले. जागृत हनुमान मंदिराचे अध्यक्ष सुनीलराव वायाळ यांनी प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या नर्मदा पुराण कथा सोहळ्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे कौतुक केले. मंदिराच्या वतीने मिलिंद महाराज चवंडके यांचा सन्मान करण्यात आला. कथा श्रवणासाठी विशेष उपस्थित राहिलेले विनायक लांडे, साहेबराव आहेर, दिगंबर आहेर व बंकटसिंग शिहरे यांचाही सन्मान करण्यात आला. खाटूश्याम भक्त मंडळाचे अध्यक्ष शाम पुरोहित, कृष्णा जायलवाल तसेच सिद्धविनायक कपाळे यांनी मिलिंद महाराजांचा सत्कार केला. श्रोत्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना लक्ष्मणराव वडे यांनी पवित्र श्रावण महिन्यात नर्मदा पुराण श्रवणाची महापर्वणी लाभल्याचे सांगितले. हभप ज्योतीताई इंगळे यांनी गायिलेली स्वरचित आरती उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारी ठरली. ॲड. विशाल जवंजाळ, वनिताताई जवंजाळ, यशश्री कपाळे, संध्याताई कपाळे, दुर्गाताई सावके, मंदाताई भुतेकर, ज्योती भुतेकर, माधुरी काळे व माधुरी कुलकर्णी यांच्या हस्ते सामुदायिक महाआरती करण्यात आली.

कन्या पूजनाने सांगता

सात दिवसीय नर्मदा पुराण कथा सोहळ्याची विधिवत सांगता कन्या पूजन व प्रसाद वाटपाने करण्यात आली. यावेळी मंदिराचे सचिव अशोकराव इंगळे, काशीनाथ बाहेकर, कासाबाई पवार, कावेरीताई लोखंडे, राखी पवार, चंद्रकलाताई टकले, नयनाताई काळे, ज्योतीताई इंगळे, कमलताई जेवूघाले, उषाताई पाटील, प्रमोदिनी वडे, सुनीताताई लोखंडे यांच्यासह स्त्री-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Buldhana Chikhali MilindMaharajChavandke Narmada Parikrama Narmada Purana Katha Chikhli
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Hospitalization : हॉस्पिटल्स बाराही महिने हाऊसफुल्ल; जीवनशैलीवर आत्मचिंतन हवे!

October 22, 2026

Ahilyanagar Farmers : शेतकऱ्यांसाठी दिलासा; कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीत ४,४१५ नावे !

October 14, 2026

Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म

October 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Hospitalization : हॉस्पिटल्स बाराही महिने हाऊसफुल्ल; जीवनशैलीवर आत्मचिंतन हवे!

October 22, 2026

Ahilyanagar Farmers : शेतकऱ्यांसाठी दिलासा; कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीत ४,४१५ नावे !

October 14, 2026

Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म

October 12, 2026

Shiv Charitra Katha : शिवाजी महाराज केवळ राजे नव्हे, तर राष्ट्रधर्माचे महानायक : स्वामी गोविंददेवगिरी महाराज

October 5, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.