Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»El Nino Water Crisis : पाणीचोरांवर आता थेट वीजबंदी; एल-निनोच्या धोक्यामुळे जिल्हा प्रशासनाची कठोर भूमिका
अहिल्यानगर

El Nino Water Crisis : पाणीचोरांवर आता थेट वीजबंदी; एल-निनोच्या धोक्यामुळे जिल्हा प्रशासनाची कठोर भूमिका

एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे.
Vinayak LandeBy Vinayak LandeJune 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260615 WA0044
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

El Nino Water Crisis : अहिल्यानगर : जिल्ह्यात एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. कालवे व बॅकवॉटरमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा तत्काळ थांबवून संबंधितांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे कठोर निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले असून, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण आणि उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यावर भर दिला आहे.

El Nino Water Crisis : पाणीचोरांवर आता थेट वीजबंदी; एल-निनोच्या धोक्यामुळे जिल्हा प्रशासनाची कठोर भूमिका
El Nino Water Crisis : पाणीचोरांवर आता थेट वीजबंदी; एल-निनोच्या धोक्यामुळे जिल्हा प्रशासनाची कठोर भूमिका
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पाणीसाठा आरक्षण व कृषी नियोजनाबाबतच्या तातडीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन शेतीसाठी देण्यात येणारे पाणी आवर्तन तत्काळ बंद करण्याचे निर्देश देताना डॉ. आशिया यांनी जलसंपदा विभागाला पाणीचोरी रोखण्यासाठी भरारी पथके नियुक्त करण्यास सांगितले. अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार संबंधित विद्युत केंद्रांमधून वीजपुरवठा बंद करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
महापालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. आवश्यकतेनुसार नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठ्याबाबत निर्णय घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जलसंपदा विभागाने विद्यमान जलसाठ्याचा आढावा घेऊन पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी सविस्तर कृती आराखडा सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस आणि जमिनीत योग्य ओल निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असा संदेश पोहोचवावा. खतांचा काळाबाजार किंवा लिकिंग होत नसल्याची खात्री करण्यासाठी भरारी पथकांमार्फत तपासणी करण्याचे आदेश देतानाच खत व बियाण्यांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला.
जिल्ह्यात सुरू असलेली जलसंधारण, गाळ काढणे आणि पाणी साठवण क्षमता वाढविण्याची कामे वेगाने पूर्ण करून उपलब्ध पावसाच्या प्रत्येक थेंबाचा साठा करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे निर्देश

– अनधिकृत पाणी उपसा तत्काळ बंद करा
– गरज पडल्यास वीजपुरवठा खंडित करा
– पिण्याच्या पाण्याचे आरक्षण प्राधान्याने राखा
– पेरणीची घाई करू नये, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा
– खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथके सक्रिय करा
– जलसंधारण व गाळ काढण्याची कामे वेगाने पूर्ण करा
Ahilyanagar Drinking Water El Nino Water Crisis Pankaj Ashiya Water Conservation Water Management
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.