Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»MPSC Preliminary Exam 2026 : एमपीएससी पूर्व परीक्षेसाठी जिल्हा सज्ज; १७,९४७ उमेदवारांची रविवारी कसोटी
अहिल्यानगर

MPSC Preliminary Exam 2026 : एमपीएससी पूर्व परीक्षेसाठी जिल्हा सज्ज; १७,९४७ उमेदवारांची रविवारी कसोटी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी रविवारी मैदानात उतरणार आहे.
Vinayak LandeBy Vinayak LandeJune 12, 2026Updated:June 13, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260612 WA0012
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

MPSC Preliminary Exam 2026 : अहिल्यानगर : राज्यसेवेचे स्वप्न साकार करण्यासाठी तब्बल १७ हजारांहून अधिक उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी रविवारी मैदानात उतरणार असून, परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक सुरक्षा आणि नियंत्रणाची उपाययोजना केली आहे.

MPSC Preliminary Exam 2026 : एमपीएससी पूर्व परीक्षेसाठी जिल्हा सज्ज; १७,९४७ उमेदवारांची रविवारी कसोटी
MPSC Preliminary Exam 2026 : एमपीएससी पूर्व परीक्षेसाठी जिल्हा सज्ज; १७,९४७ उमेदवारांची रविवारी कसोटी
१४ जून रोजी जिल्ह्यातील ५७ परीक्षा उपकेंद्रांवर १७ हजार ९४७ उमेदवार परीक्षा देणार आहेत. परीक्षा प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी हे आदेश जारी केले आहेत. परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाने व्यापक यंत्रणा उभारली असून १३ उपजिल्हाधिकारी दर्जाचे समन्वय अधिकारी, २ भरारी पथक अधिकारी, ५७ उपकेंद्रप्रमुख, १६१ पर्यवेक्षक, ८११ सहवेक्षकांसह विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उमेदवारांना सकाळी ९.३० वाजल्यापासून परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार असून, आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. परीक्षा कक्षात मोबाईल, कॅल्क्युलेटर, डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन आदी इलेक्ट्रॉनिक साधनांवर बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील सर्व एसटीडी बूथ, फॅक्स सेवा केंद्रे आणि झेरॉक्स दुकानेही परीक्षेच्या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उमेदवारांनी प्रवेशपत्र आयोगाच्या संकेतस्थळावरूनच डाउनलोड करून घ्यावीत; दुय्यम प्रवेशपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातून उपलब्ध होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

परीक्षेसाठी प्रशासनाची मोठी यंत्रणा

• उमेदवार : १७,९४७
• परीक्षा केंद्रे : ५७
• समन्वय अधिकारी : १३
• भरारी पथक अधिकारी : २
• पर्यवेक्षक : १६१
• सहवेक्षक : ८११
• इतर कर्मचारी व सहाय्यक : ५०० हून अधिक
Ahilyanagar District Administration MPSC Preliminary Exam 2026 Nagar
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.