Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Pulse Polio Vaccination Campaign : पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरदेवळेत उत्स्फूर्त प्रतिसाद
अहिल्यानगर

Pulse Polio Vaccination Campaign : पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरदेवळेत उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नागरदेवळे येथे रविवारी (ता. २८) उत्साहपूर्ण वातावरणात लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
Vinayak LandeBy Vinayak LandeJune 28, 2026Updated:June 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260628 WA0000
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Pulse Polio Vaccination Campaign : अहिल्यानगर : पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नागरदेवळे येथे रविवारी (ता. २८) उत्साहपूर्ण वातावरणात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जिल्हा परिषद शाळेत सरपंच राम पानमळकर यांच्या हस्ते बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. सकाळपासूनच पालकांनी आपल्या पाल्यांना लस देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Pulse Polio Vaccination Campaign : पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरदेवळेत उत्स्फूर्त प्रतिसाद
Pulse Polio Vaccination Campaign : पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरदेवळेत उत्स्फूर्त प्रतिसाद
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. या वेळी पालकांना नियमित लसीकरणासोबतच प्रत्येक राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत आपल्या बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजण्याचे आवाहन देवगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिभाऊ गाढे,  डॉ. सुमैय्या पठाण यांनी केले.
Pulse Polio Vaccination Campaign : पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरदेवळेत उत्स्फूर्त प्रतिसाद
Pulse Polio Vaccination Campaign : पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरदेवळेत उत्स्फूर्त प्रतिसाद
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल घंगाळे, ग्रामपंचायत अधिकारी नेताजी भाबड, परिचारिका स्मिता गायकवाड, आरोग्य सेवक सचिन चितळे, विवेक गुंड, प्रशांत लोंढे, गटप्रवर्तक कल्पना शेंडे, महिला आरोग्य पर्यवेक्षिका सुनीता काळे तसेच आशा स्वयंसेविका सोनाली धाडगे, सुनीता कड आदी उपस्थित होते.
Pulse Polio Vaccination Campaign : पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरदेवळेत उत्स्फूर्त प्रतिसाद
Pulse Polio Vaccination Campaign : पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरदेवळेत उत्स्फूर्त प्रतिसाद
मोहीम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, महिला आरोग्य पर्यवेक्षिका आणि आशा स्वयंसेविकांनी सक्रिय सहभाग घेत प्रत्येक पात्र बालकापर्यंत पोलिओ लस पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नागरदेवळेच्या कार्यक्षेत्रातील १० केंद्रांवर ५ वर्षांखालील २,२०० बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ ही यंदाच्या मोहिमेची टॅगलाईन असून प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचविण्याचा निर्धार आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.
Administration Ahilyanagar Child Health Child vaccination Nagardevale Primary health centre Pulse Polio Vaccination Campaign
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.