Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»PM Surya Ghar Yojana : मोफत वीजेच्या दिशेने महाराष्ट्राची झेप; देशात अव्वल कामगिरी
महाराष्ट्र

PM Surya Ghar Yojana : मोफत वीजेच्या दिशेने महाराष्ट्राची झेप; देशात अव्वल कामगिरी

एका दिवसात तब्बल ४,७०० घरांवर सौर प्रकल्प उभारण्याचा विक्रम करत राज्याने हरित ऊर्जेच्या क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. 
Vinayak LandeBy Vinayak LandeJune 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260602 WA0007
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

PM Surya Ghar Yojana : अहिल्यानगर : घराघरांत सौरऊर्जेचा प्रकाश पोहोचवत महाराष्ट्राने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. एका दिवसात तब्बल ४,७०० घरांवर सौर प्रकल्प उभारण्याचा विक्रम करत राज्याने हरित ऊर्जेच्या क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे.

PM Surya Ghar Yojana : मोफत वीजेच्या दिशेने महाराष्ट्राची झेप; देशात अव्वल कामगिरी
PM Surya Ghar Yojana : मोफत वीजेच्या दिशेने महाराष्ट्राची झेप; देशात अव्वल कामगिरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणमार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राने मे महिन्यात देशातील सर्वाधिक ४ लाख ४९ हजार अर्ज प्राप्त केले. तसेच सौर प्रकल्पांच्या तपासणीत प्रथम, कंत्राटदार नोंदणीत द्वितीय आणि एकूण प्रकल्प उभारणीत द्वितीय क्रमांक पटकावत महाराष्ट्राने देशातील टॉप पाच राज्यांमध्ये दमदार उपस्थिती नोंदविली आहे.
केंद्रीय नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्याच्या या यशाबद्दल अभिनंदन करताना महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीचे विशेष कौतुक केले आहे. राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनीही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचे अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील या योजनेअंतर्गत घरगुती ग्राहकांना छतावरील सौरऊर्जा प्रकल्पासाठी थेट अनुदान दिले जाते. एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये तर तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे.
मे महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात महाराष्ट्राने देशभरात सर्वाधिक प्रतिसाद मिळवत अर्ज स्वीकृती, प्रकल्प उभारणी आणि तपासणी या तिन्ही महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. यामुळे राज्यातील लाखो कुटुंबांच्या वीजबिलमुक्त भविष्यासह हरित ऊर्जेकडे वाटचाल अधिक वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे.
Administration Ahilyanagar Maharashtra Mahavitran PM Surya Ghar Yojana Social
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर संदेश कार्लेंची वर्णी

July 11, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.