Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Rain Alert : मेघगर्जना, वादळी वारे अन् पाऊस; ३ जूनपर्यंत सावध राहा
अहिल्यानगर

Rain Alert : मेघगर्जना, वादळी वारे अन् पाऊस; ३ जूनपर्यंत सावध राहा

Vinayak LandeBy Vinayak LandeMay 31, 2026No Comments1 Min Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260531 WA0020
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Rain Alert : अहिल्यानगर : जिल्ह्यावर पुढील चार दिवस अवकाळी संकटाचे सावट असून विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाच्या शक्यतेमुळे हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. नागरिकांसह शेतकऱ्यांनीही सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Rain Alert : मेघगर्जना, वादळी वारे अन् पाऊस; ३ जूनपर्यंत सावध राहा
Rain Alert : मेघगर्जना, वादळी वारे अन् पाऊस; ३ जूनपर्यंत सावध राहा
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार ३१ मे ते ३ जूनदरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटा वेळी झाडाखाली, मोकळ्या मैदानात किंवा उंच धातूच्या संरचनांजवळ थांबू नये. वीजेचे खांब, टॉवर, रोहित्र, लोंबकळणाऱ्या केबल्स तसेच विद्युत उपकरणांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यामुळे जाहिरात फलक, झाडांच्या फांद्या किंवा इतर वस्तू कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
शेतकऱ्यांनी काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, बाजार समित्यांमध्ये आणलेल्या मालाची योग्य व्यवस्था करावी तसेच जनावरांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. धरण, नदी व कालव्यांच्या परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्यांनी विशेष दक्षता घेऊन पाण्यात उतरणे टाळावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. मदतीसाठी १०७७ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Administration Ahilyanagar IMD Jilhadhikari Rain Alert
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर संदेश कार्लेंची वर्णी

July 11, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.