Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Cheque Bounce : चेक बाऊन्स प्रकरणी कठोर निकाल; महिलेला तुरुंगवास, लाखोंची नुकसानभरपाई
अहिल्यानगर

Cheque Bounce : चेक बाऊन्स प्रकरणी कठोर निकाल; महिलेला तुरुंगवास, लाखोंची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जी. जी. सोनी यांनी वैष्णवी विकेश गायकवाड हिला ३ महिन्यांची साधी कैद व ६ लाख ५४ हजार ६३७ रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. रक्कम न भरल्यास आरोपी महिलेस आणखी ६ महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार असल्याचा निकाल न्यायालयाने सुनावला.
Vinayak LandeBy Vinayak LandeMay 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260520 WA0036
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Cheque Bounce : अहिल्यानगर : धनादेश अनादर प्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जी. जी. सोनी यांनी वैष्णवी विकेश गायकवाड हिला ३ महिन्यांची साधी कैद व ६ लाख ५४ हजार ६३७ रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. रक्कम न भरल्यास आरोपी महिलेस आणखी ६ महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार असल्याचा निकाल न्यायालयाने सुनावला.

Cheque Bounce : चेक बाऊन्स प्रकरणी कठोर निकाल; महिलेला तुरुंगवास, लाखोंची नुकसानभरपाई
Cheque Bounce : चेक बाऊन्स प्रकरणी कठोर निकाल; महिलेला तुरुंगवास, लाखोंची नुकसानभरपाई
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी महिला वैष्णवी विकेश गायकवाड व फिर्यादी रोहित राजेंद्र बडे यांनी भागीदारीत व्यवसाय सुरू केला होता. काही कारणांमुळे रोहित बडे यांनी व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना देय रक्कम निश्चित करण्यात आली. ती रक्कम देण्यासाठी आरोपी महिलेने फिर्यादीस धनादेश दिला. मात्र हा धनादेश बँकेत जमा केल्यानंतर तो अनादरित झाला.
यानंतर फिर्यादी रोहित बडे यांनी विधीज्ञ गोरक्ष पालवे यांच्यामार्फत आरोपी महिलेस नोटीस बजावून धनादेशाची रक्कम मागितली. मात्र रक्कम न मिळाल्याने फिर्यादीने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट कलम १३८ अंतर्गत न्यायालयात खटला दाखल केला होता.
सदर खटल्याच्या सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपी महिलेस दोषी ठरवून ३ महिन्यांची साधी कैद व ६ लाख ५४ हजार ६३७ रुपये नुकसानभरपाई फिर्यादीस देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नुकसानभरपाईची रक्कम न भरल्यास आरोपीस अतिरिक्त ६ महिन्यांची साधी कैद सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात फिर्यादी रोहित बडे यांच्यावतीने विधीज्ञ गोरक्ष पालवे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना अॅड. गुरविंदर पंजाबी, सागर गरजे, रोहित बुधवंत, राहुल दहिफळे, विशाल वांढेकर, धनश्री खेतमाळीस, रोहित चांडवले, विवेक बडे, पुष्कर बिडवाई, प्रवीण निंबाळकर, विवेकानंद बडे, तेजस राख, भक्ती तमनर, बाळकृष्ण गीते, यश केकान यांनी सहाय्य केले.
Ahilyanagar Cheque Bounce Court Judgement Police
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर संदेश कार्लेंची वर्णी

July 11, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.