Ahilyanagar News : अहिल्यानगर : बालविवाह रोखण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाचा धडक अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत असून, वर्षभरात तब्बल ५५ बालविवाह हाणून पाडण्यात प्रशासनाला यश आले. कायद्याचा धाक दाखवत १५ कुटुंबांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आल्याने बालविवाहाविरोधातील मोहीम अधिक आक्रमक झाली आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांनी ही माहिती दिली. बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हाभर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, पथनाट्य, पोस्टर्स, चिकटपत्रके, शपथ अभियान आदी विविध माध्यमांतून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे. ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत बालविवाह विरोधी…
Author: Vinayak Lande
Bakri Eid २०२६ : ‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असून शांतता, स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यावर भर देण्यात आला आहे. नियमभंग, विनापरवाना वाहतूक आणि अनधिकृत कत्तलीवर कठोर कारवाईचा इशारा देत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समिती व प्राणी क्लेश प्रतिबंधक जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त उमेश पाटील, सहायक आयुक्त डॉ. मुकुंद राजळे, अन्न व औषध निरीक्षक जी. बी. भोर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. डॉ. आशिया म्हणाले, “सण उत्साहात साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार…
Cheque Bounce : अहिल्यानगर : धनादेश अनादर प्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जी. जी. सोनी यांनी वैष्णवी विकेश गायकवाड हिला ३ महिन्यांची साधी कैद व ६ लाख ५४ हजार ६३७ रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. रक्कम न भरल्यास आरोपी महिलेस आणखी ६ महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार असल्याचा निकाल न्यायालयाने सुनावला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी महिला वैष्णवी विकेश गायकवाड व फिर्यादी रोहित राजेंद्र बडे यांनी भागीदारीत व्यवसाय सुरू केला होता. काही कारणांमुळे रोहित बडे यांनी व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना देय रक्कम निश्चित करण्यात आली. ती रक्कम देण्यासाठी आरोपी महिलेने फिर्यादीस धनादेश दिला. मात्र हा धनादेश बँकेत जमा…
Crime : अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील भांडगाव येथे खून करून १२ लाख ७० हजार रुपयांची जबरी चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत अटक करून गुन्हा उघडकीस आणला. आरोपीकडून रोख रक्कम, मोबाईल व दुचाकीसह एकूण १० लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पारनेर पोलीस ठाण्यात कलम १०३ (१), ३०९(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत माहिती अशी की, फिर्यादी सिद्धेश संदीप खरमाळे (रा. भुजवळवस्ती, भांडगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या वडिलांवर अज्ञात इसमाने चोरीच्या उद्देशाने डोक्यात हत्याराने मारहाण करून त्यांना ठार केले व घरातील १२ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने चोरून…
Ahilyanagar News : अहिल्यानगर : संगमनेर परिसरात बिअर बार व मद्यदुकाने फोडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड करत मोठे यश मिळविले आहे. या कारवाईत ५ गुन्हे उघडकीस आणून ५ लाख ५५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात कलम ३०३ (२), ३३१(४) अन्वये ३ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात फिर्यादी किशोर बाळाजी डोके (रा. खंदरमाळवाडी, ता. संगमनेर) यांच्या हॉटेल निलायम बार येथे अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून ३ लाख सहा हजार १९० रुपये किमतीची विदेशी दारू, सिगारेट व सीसीटीव्ही डीव्हीआर चोरून नेला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक किरणकुमार…
Radhakrishna Vikhe Patil : अहिल्यानगर : बोगस बियाणे व खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर केवळ परवाना निलंबन न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. पीकविमा कंपन्यांच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्यांवरही कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे पाटील, विक्रमसिंह पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आत्माचे प्रकल्प संचालक प्रदीप लाटे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक…
Mahavitran : अहिल्यानगर : इंधन बचतीसाठी महावितरणने पेट्रोल-डिझेल वाहनांना पर्याय म्हणून विद्युत वाहनांचा वापर सुरू केला असून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह सर्व संचालकांनी ईव्हीवर ‘स्विच’ केले आहे. राज्य शासनाच्या ईव्ही धोरणानुसार महावितरणच्या ताफ्यात नवीन ईव्ही वाहने दाखल झाली असून आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयांसाठीही केवळ विद्युत वाहनांचा वापर सुनिश्चित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या आवाहनाला महावितरणने तत्काळ कृतीशील प्रतिसाद देत एक पाऊल पुढे टाकून विद्युत वाहनांचा वापर सुरू केला आहे. राज्य शासनाच्या विद्युत…
Simhastha Kumbhmela : मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेत प्रति आखाडा ५ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली. कुंभमेळ्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, तसेच आखाड्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्यास मोबदला किंवा पर्यायी जमीन दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व १३…
Weather Update : अहिल्यानगर जिल्ह्यात १२ ते १४ मे दरम्यान तुरळक ठिकाणी उष्मालाटेची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी पिणे, उन्हात जाणे टाळणे व आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी काय करावे? तहान लागली नसली तरी दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस घ्यावे. तसेच ताक, लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबूपाणी यांचा नियमित वापर करावा. घराबाहेर पडताना छत्री किंवा टोपीचा वापर करावा. शक्य असल्यास ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हापासून बचावासाठी हलके, पातळ व सुती…
Ashtavinayak Temple : पुणे : अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या जतन-संवर्धन व दुरुस्ती कामांमुळे मोरगावचे मयुरेश्वर, थेऊरचे चिंतामणी आणि सिद्धटेकचे सिद्धिविनायक मंदिर ही मंदिरे ९ जून २०२६ पर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान या कालावधीत मंदिरातील नित्यपूजा व धार्मिक विधी नियमित सुरू राहणार, मात्र भाविकांना प्रत्यक्ष दर्शनासाठी प्रवेश मिळणार नाही, असे पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले आहे. अष्टविनायक मंदिरापैकी तीन मंदिरांचे जतन, देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामांसाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टने शासनाचे आभार मानले आहेत. सध्या मोरगाव, थेऊर व सिद्धटेक येथे मुख्य मंदिर तसेच मंदिर परिसरातील संवर्धन व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर…