Author: Vinayak Lande

Acid Attack Case :अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यात सहावीत शिकाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अज्ञात तरूणाकडून ॲसिड हल्ला केल्याची नुकतीच धक्कादायक घटना घडली. वडगाव पान शाळेमधील ही विद्यार्थिनी घरी जात असताना, अचानक तिच्यासमोर विकृत आला आणि त्याने थेट चिमुरडीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. या हल्ल्यानंतर विकृत हल्लेखोर फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वडगावपान येथील ॲसिड हल्लाग्रस्त विद्यार्थिनीची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. या घटनेतील आरोपीच्या मुसक्या आवळल्याशिवाय पोलीस प्रशासन स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ॲसिड हल्ला झालेल्या विद्यार्थिनीवर ​रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने वेळेवर घेतलेल्या…

Read More

Rahuri Assembly Election : अहिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली. राहुरी विधानसभा मतदारसंघाबाबत नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक व्ही. कुमार, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी शैलेश मोरे आदी उपस्थित होते. राहुरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेली सर्व भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके व नियंत्रण कक्षांनी कार्यान्वित करण्यात आले आहे. या सर्व पथकांनी दैनंदिन अहवाल वेळेत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. खर्च निरीक्षक व्ही. कुमार म्हणाले,…

Read More

Property Registration Update : अहिल्यानगर : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मालमत्ता खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता, तसेच सरकारी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार मार्च महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मार्च महिन्यात मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये मोठी वाढ होत आहे. १ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध होत असलेल्या बाजारमूल्य दर तक्त्यामध्ये स्थावर मिळकतीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक नागरिक नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी दस्त नोंदणी पूर्ण करण्यास प्राधान्य देतात. परिणामी मार्च महिन्यात नोंदणी कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होत असते. नागरिकांची गैरसोय…

Read More

Weather Alert : अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात १७ ते १९ मार्च राेजी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर १८ व १९ मार्च रोजी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी भारतीय हवामान खात्याने घोषित केला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपत्तीच्या सूचनांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार या कालावधीत शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडणे व दमदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. नागरिकांनी धाेकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्ष‍ित ठिकाणी आश्रय घ्यावा. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत…

Read More

Election Commission : राज्याचं लक्ष लागलेल्या राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीचा अखेर बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (ता. १५) तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पद्दुचेरी या ठिकाणच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. या निवडणुकीसोबत महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी व पुणे जिल्ह्यातील बारामती, अशा दोन्ही मतदारसंघाची २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. तर ४ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सामना रंगतो की निवडणूक बिनविरोध होते, हे पाहणे गरजेचे आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे १७ ऑक्टोबर रोजी निधन झाले होते. त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली…

Read More

Maharashtra Weather : अहिल्यानगर : राज्यातील काही भागात १७ ते २० मार्च राेजी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसणार आहे, असे भाकीत भारतीय हवामान खात्याने वर्तवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्याच्या अंदाजानुसार १८ ते २० मार्च दरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. कृषी विभागाचे आवाहन शेतकऱ्यांनी शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी…

Read More

LPG GAS Cylinder : अहिल्यानगर : मागील काही दिवसांपासून महागाई, सोन्याच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे लग्नसराईवर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यातच आता अमेरिका – इस्रायल- इराण युद्धामुळे गॅस टंचाईच्या झळा बसत आहे, त्यामुळे विवाह सोहळ्याच्या जेवणावळी कशा होणार?, असा प्रश्न वधू-वर पित्यासमोर निर्माण झाला आहे. लग्न समारंभात पंगती उठण्यासाठी गॅस सिलेंडरची नितांत गरज पडते. लग्नात हजार, दोन हजार लोकांच्या जेवणावळी असतात. मात्र, ऐन लग्नसराईत गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक कुटुंबांना विवाह सोहळा पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. राज्यात अनेक केटरर्सनी लग्न समारंभातील जेवणाच्या ऑर्डर रद्द करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बहुतांश कुटुंबांच्या आनंदाच्या क्षणांवर चिंतेचे सावट पसरले आहे. केटरर्ससमोर…

Read More

LPG GAS : अहिल्यानगर :  जिल्ह्यात एलपीजी गॅसच्या पुरवठ्याबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये. जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली. गॅस पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की, जिल्ह्यातील एलपीजी गॅस गोदामांची विशेष पथकामार्फत अचानक तपासणी करण्यात यावी. कृत्रिम टंचाई निर्माण करून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी एम. के. चौधरी, बीपीसीएलचे राजकुमार मिश्रा, तसेच विविध गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी व वितरक उपस्थित…

Read More

Radhakrishna Vikhe Patil : अहिल्यानगर : अहिल्यानगर शहराला राज्यातील अग्रगण्य शहर म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी अधिक प्रभावी नियोजनाची गरज आहे. त्यासाठी व्यावसायिक, औद्योगिक आणि नागरीकरणाच्या दृष्टीने शहराचा सर्वंकष विकास साधण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करून तो पूर्णत्वास नेण्यावर भर दिला जाणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. शहरातील गुलमोहर रोड परिसरात नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन उभारण्यात आलेल्या नवीन स्ट्रीट लाईट प्रकल्पाचे उद्घाटन विद्यार्थी आर्या घोडके, पार्थ खंडेलवाल, रिधान शिंदे आणि पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, नगरसेविका गौरी बोरकर, नगरसेवक ऋग्वेद गंधे, जिल्हा पोलीस अधीक्षक…

Read More

Mahavitran : अहिल्यानगर : शासनाच्या सौर ऊर्जा योजनेवर विश्वास ठेवून लाखो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांनाच अवाजवी वीजबिलांचा फटका बसत असल्याची धक्कादायक प्रकरणे जिल्ह्यात उघडकीस आली आहेत. सौर प्रकल्प उभारल्यानंतर वीजबिलात बचत होण्याऐवजी उलट लाखोंची थकबाकी दाखवून वीजपुरवठा खंडित करण्याचे इशारे दिले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादितच्या ग्रामीण उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत संबंधित प्रकरणांची तातडीने तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली. ३ किलोवॅट सौर प्रकल्पानंतरही थकबाकीचा धक्का टाकळी काझी येथील शेतकरी श्रीमंत उर्फ सचिन म्हस्के यांनी महावितरणची विधिवत परवानगी घेऊन ३ किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारला. सौर ऊर्जेमुळे…

Read More