Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन
अहिल्यानगर

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन
Vinayak LandeBy Vinayak LandeApril 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260414 WA0010
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Dr. Babasaheb Ambedkar : स्वातंत्र्य
समता, न्याय आणि बंधुतेचा मार्ग दाखवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही समाजासाठी दीपस्तंभ आहेत. हे विचार जीवनात उतरवल्यासच सकारात्मक परिवर्तन शक्य होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन
Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच सामाजिक समता सप्ताहाच्या समारोपानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, जात पडताळणी विभागाचे सदस्य सचिव अनिल तिदमे, व्याख्याते डॉ. बापू चंदनशिवे, सीएसआरडीचे डॉ. सुरेश मुगुटमल, संजय आरणे आदी उपस्थित होते.

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन
Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, “डॉ. आंबेडकर यांनी प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्याचे महान कार्य केले. देशातील सर्वसामान्य नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळवून देत त्यांनी लोकशाहीची भक्कम पायाभरणी केली. त्यामुळेच आज देशातील लोकशाही सक्षमपणे टिकून आहे. समाजातील विषमता दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर अखंड संघर्ष केला. सर्व घटकांना सोबत घेऊन समानतेचा मार्ग समाजासमोर ठेवला. त्यांच्या विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब केल्यास समाजात सकारात्मक आणि शाश्वत परिवर्तन घडू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन
Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

यावेळी व्याख्याते डॉ. बापू चंदनशिवे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मानवी हक्कांचे जतन व प्रतिपालन करणारे महान व्यक्तिमत्त्व होते. ‘मूकनायक’ वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहातून त्यांनी सामाजिक समतेसाठी ऐतिहासिक लढा उभारला. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यांचा संगम असलेली राज्यघटना देऊन त्यांनी समाजव्यवस्थेला नवी दिशा दिली.”

सीएसआरडीचे डॉ. सुरेश मुगुटमल यांनी सांगितले की, “डॉ. आंबेडकर हे सामाजिक न्यायाचे प्रणेते होते. त्यांनी घटनेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. स्वातंत्र्यानंतर देश एकसंघ राहण्यामागे आदर्श राज्यघटनेचे मोठे योगदान आहे.”

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी समता सप्ताहात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची तसेच विभागाच्या योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उद्देशिकेचे सामूहिक वाचनही करण्यात आले. कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच विविध योजनांतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सॅम्युअल वाघमारे यांनी केले, तर आभार डॉ. प्रदीप जारे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Administration Ahilyanagar Dr. Babasaheb Ambedkar Jilhadhikari
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन

April 16, 2026

Women’s Self-Help Groups : बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ झेप; अहिल्यानगरमध्ये विक्रमी कर्जवाटप

April 12, 2026

Avdhut Dada Guru : दादागुरु महाराजांचे अहिल्यानगरीत प्रथमच आगमन; भक्तांसाठी पर्वणी

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन

April 16, 2026

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

April 14, 2026

Women’s Self-Help Groups : बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ झेप; अहिल्यानगरमध्ये विक्रमी कर्जवाटप

April 12, 2026

Avdhut Dada Guru : दादागुरु महाराजांचे अहिल्यानगरीत प्रथमच आगमन; भक्तांसाठी पर्वणी

April 9, 2026

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.