Voter ID Proofs : अहिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानासाठी मतदारांकडे मतदार ओळखपत्र (EPIC) असणे आवश्यक आहे. मात्र, मतदानाच्या दिवशी एखाद्या मतदाराकडे मतदार ओळखपत्र उपलब्ध नसल्यास त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार नाही. यासाठी निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त बारा पर्यायी कागदपत्रांना मतदानासाठी ग्राह्य धरले आहे. यापैकी कोणताही एक दस्तऐवज सादर करून मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात, असे निवडणूक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

