Author: Vinayak Lande

Indurikar Maharaj : अहिल्यानगर : इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात झालेल्या चेनस्नॅचिंग प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगरने धडाकेबाज कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली. आरोपींकडून ११.५ ग्रॅम सोन्यासह मोबाईल व मोटारसायकल असा एकूण २ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपी फरार आहेत. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. लग्नाच्या सोहळ्यात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून पळ काढला होता. याबाबत माहिती अशी की, या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला खात्रीशीर माहिती मिळाली की, हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी सागर…

Read More

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे बालविवाहविरोधी कारवाईला मोठे यश मिळाले आहे. एकाच दिवसात तब्बल ९ बालविवाह थांबविण्यात प्रशासन यशस्वी झाले आहे. नगर शहरासह विविध तालुक्यांमध्ये ही धडक मोहीम राबविण्यात आली. ३ मे २०२६ रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. या अंतर्गत नगर शहरात ३, अकोले १, राहुरी १, श्रीगोंदा १, पाथर्डी १, नेवासा १ आणि नगर तालुका १ अशा एकूण ९ ठिकाणी बालविवाह रोखण्यात आले. या मोहिमेत पोलीस प्रशासन, ग्रामसेवक, सरपंच-उपसरपंच, अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका, जिल्हा बालसंरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाइन यांचा सक्रिय सहभाग राहिला. सर्व…

Read More

Rahuri Election  : अहिल्यानगर : राहुरी पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डिले यांनी १ लाख १२ हजार ५८७ मताधिक्याने ऐतिहासिक विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला. २७ फेऱ्यांमध्ये पहिल्यापासून आघाडी कायम ठेवत भाजपने राहुरीतील आपला गड पुन्हा मजबूतपणे राखला अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर भाजपने अक्षय कर्डिले यांच्यावर विश्वास टाकला होता. त्या विश्वासाला सार्थ ठरवीत अक्षय कर्डिले यांनी विरोधकांचा लाखोच्या मतांनी दारुण पराभव केला आहे. राहुरी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय…

Read More

Goda to Narmada Jalyatra : अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या भूमीतून सुरू झालेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा महेश्वर येथे मंत्रघोषात आणि नर्मदा आरतीच्या साक्षीने मंगल समारोप झाला. महाराष्ट्रातील १३० नद्यांचे जल नर्मदेत विसर्जित करत जलसंवर्धनाचा संदेश देण्यात आला असून, महाराष्ट्र–मध्यप्रदेशचे नाते अधिक दृढ झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पवित्र भूमीतून सुरू झालेल्या आणि गोदावरी मातेच्या उगमस्थान श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान केलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा नुकताच महेश्वर येथे अत्यंत मंगल, भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात समारोप झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ही जलयात्रा आयोजित करण्यात आली. पाच…

Read More

Drug Free : अहिल्यानगर : जिल्ह्यात ड्रग्सविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून कारवाईसाठी तपास यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत अमली पदार्थांच्या ४० प्रकरणांमध्ये ५५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये आदी उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी गिते म्हणाले, “शाळा व महाविद्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यावर भर द्यावा. तसेच ड्रग्स डिटेक्शन किट्स व टेस्टिंग केमिकल्स यांची उपलब्धता सुनिश्चित करून…

Read More

Mahavitaran : अहिल्यानगर : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी महावितरणकडून राज्यभरात मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे वेगात सुरू आहेत. मात्र, दुपारच्या कडक उन्हात वीज बंद राहिल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याने, ही सर्व कामे सकाळी ७ ते ११ या वेळेत करण्याचे निर्देश महावितरण मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. महावितरणकडून पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार आणि वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. साधारणतः ही कामे मे महिन्याच्या अखेरीस पूर्णत्वास जातात. मात्र, सध्या काही ठिकाणी सकाळी १० ते दुपारी २ किंवा ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवून कामे सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा…

Read More

Census : अहिल्यानगर : देशाच्या विकास नियोजनाचा पाया असलेल्या जनगणना प्रक्रियेत कोणतीही चूक होऊ नये, जनगणना म्हणजे राष्ट्राचा आरसा आहे. यासाठी प्रगणकांनी अचूक व प्रामाणिकपणे माहिती नोंदवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या प्रगणक प्रशिक्षणाला भेट देत त्यांनी शिस्त, समन्वय आणि नम्र संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात प्रगणकांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षण सत्राला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, निवासी नायब तहसीलदार महादेव कारंडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, “जनगणना करताना नागरिकांशी संवाद साधताना नम्रता, संयम व विश्वासार्हता राखणे अत्यंत आवश्यक…

Read More

Rain Alert : अहिल्यानगर : जिल्ह्यात २४ व २५ एप्रिल रोजी काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. वादळी वारा व वीज चमकत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहणे टाळावे, तसेच वीजवाहक तारांपासून सुरक्षित अंतर राखावे. घराबाहेर पडताना शक्यतो इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळावा आणि लोखंडी वस्तूशी संपर्क टाळावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मोकळ्या मैदानात, शेतात किंवा उंच ठिकाणी उभे राहणे टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच वीज खांब, ट्रान्सफॉर्मर, टॉवर,…

Read More

Goda, Narmada campaign :अहिल्यानगर : ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेमुळे जलव्यवस्थापनाच्या कार्याला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथे २५ एप्रिलला यात्रेचा प्रारंभ होणार आहे. चौंडी येथे आयोजित ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे, अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे, अलका अहिरराव, रवी अनासपुरे आदी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तळ्यांचे नूतनीकरण, गावतळी निर्मिती, पाणीसंवर्धन तसेच मंदिरांचा जीर्णोद्धार अशा माध्यमातून समाजासाठी भरीव कार्य केले. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे…

Read More

Census : अहिल्यानगर : आगामी राष्ट्रीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले घरयादी गटनिश्चिती व सीमांकन तसेच नकाशे तयार करण्याचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या. जनगणनेसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या कामात कोणतीही दिरंगाई चालणार नसून, आवश्यक तेथे सुटीच्या दिवशीही काम सुरू ठेवून २० एप्रिलच्या आत काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी तसेच जनगणनेचे नोडल अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी तालुका व नगरपरिषदनिहाय प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. काही ठिकाणी काम संथगतीने सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने…

Read More