Rain Alert : अहिल्यानगर : जिल्ह्यात २४ व २५ एप्रिल रोजी काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.

