Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Goda, Narmada campaign : जलसंवर्धनासाठी अहिल्यादेवींच्या नावाने ‘गोदा-नर्मदा’ अभियान : मंत्री विखे पाटील
अहिल्यानगर

Goda, Narmada campaign : जलसंवर्धनासाठी अहिल्यादेवींच्या नावाने ‘गोदा-नर्मदा’ अभियान : मंत्री विखे पाटील

Vinayak LandeBy Vinayak LandeApril 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260419 WA0013
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Goda, Narmada campaign :अहिल्यानगर : ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेमुळे जलव्यवस्थापनाच्या कार्याला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथे २५ एप्रिलला यात्रेचा प्रारंभ होणार आहे.

Goda, Narmada campaign
Goda, Narmada campaign
चौंडी येथे आयोजित ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे, अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे, अलका अहिरराव, रवी अनासपुरे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तळ्यांचे नूतनीकरण, गावतळी निर्मिती, पाणीसंवर्धन तसेच मंदिरांचा जीर्णोद्धार अशा माध्यमातून समाजासाठी भरीव कार्य केले. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि जलसंवर्धनाच्या कामांना व्यापक चालना देण्यासाठी या जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विविध नद्यांचे जल एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीकही या यात्रेतून साकार होईल. २५ एप्रिल रोजी त्र्यंबकेश्वर येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोदावरीच्या उगमस्थानातून जलकलश घेऊन यात्रेला प्रारंभ होईल. ही यात्रा नाशिक, सिन्नर मार्गे संगमनेर येथे पहिला मुक्काम करेल. त्यानंतर लोणी मार्गे शिर्डी येथे पोहोचेल. चौंडी येथून निघालेली यात्रा अहिल्यानगर येथे पहिला व शिर्डी येथे दुसरा मुक्काम करेल. तिसऱ्या दिवशी दोन्ही यात्रा एकत्र येऊन संभाजीनगर मार्गे घृष्णेश्वर येथे मुक्कामी राहतील. चौथ्या दिवशी कन्नड-चाळीसगाव मार्गे धुळे येथे मुक्काम होईल. पाचव्या दिवशी म्हणजेच २९ एप्रिल २०२६ रोजी दुपारपर्यंत महेश्वर येथे पोहोचून मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जलकलश स्वीकारल्यानंतर यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे. या यात्रेत राज्यातील ३० प्रमुख नद्यांचे जलकलश शिर्डी येथे एकत्रित करून पुढे महेश्वर येथे विसर्जित करण्यात येणार आहे. यात्रेत वारकरी संप्रदायाचाही सहभाग घेतला जाणार असून नागरिकांसाठी आवश्यक सुविधा व पार्किंग व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे. शिर्डी येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहे.”

‘जलयात्रा’ जनजागृतीसाठी प्रभावी ठरणार : राम शिंदे

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, “जलसंवर्धन, पाणी व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ ही अत्यंत प्रभावी ठरणार आहे. २५ एप्रिल रोजी चौंडी येथून जलयात्रेला प्रारंभ होणार असून दुसरी जलयात्रा त्र्यंबकेश्वर येथून निघणार आहे. चौंडी येथून निघणाऱ्या यात्रेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लाभणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीची माती तसेच सीना नदीतील पवित्र जल घेऊन ही यात्रा मार्गस्थ होईल. ही ऐतिहासिक घटना असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,’ असे आवाहन त्यांनी केले.
Administration Ahilyanagar Goda Madhyapradesh Narmada campaign Radhakrishna Vikhe Patil Ram shinde
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Census : जनगणनेच्या कामात दिरंगाई चालणार नाही; जिल्हाधिकार्‍यांचे स्पष्ट निर्देश

April 19, 2026

IMD weather update : विजांच्या कडकडाटासह काही भागात पावसाच्या सरी बरसणार; हवामान खात्याचा अंदाज

April 18, 2026

Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन

April 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Goda, Narmada campaign : जलसंवर्धनासाठी अहिल्यादेवींच्या नावाने ‘गोदा-नर्मदा’ अभियान : मंत्री विखे पाटील

April 21, 2026

Census : जनगणनेच्या कामात दिरंगाई चालणार नाही; जिल्हाधिकार्‍यांचे स्पष्ट निर्देश

April 19, 2026

IMD weather update : विजांच्या कडकडाटासह काही भागात पावसाच्या सरी बरसणार; हवामान खात्याचा अंदाज

April 18, 2026

Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन

April 16, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.