Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Goda to Narmada Jalyatra : अहिल्यादेवींच्या राजधानीत जलयात्रेचा मंगल समारोप; नर्मदा घाटावर भक्तिसागर
अहिल्यानगर

Goda to Narmada Jalyatra : अहिल्यादेवींच्या राजधानीत जलयात्रेचा मंगल समारोप; नर्मदा घाटावर भक्तिसागर

Vinayak LandeBy Vinayak LandeApril 30, 2026No Comments3 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260430 WA0018
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Goda to Narmada Jalyatra : अहिल्यानगर :
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या भूमीतून सुरू झालेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा महेश्वर येथे मंत्रघोषात आणि नर्मदा आरतीच्या साक्षीने मंगल समारोप झाला. महाराष्ट्रातील १३० नद्यांचे जल नर्मदेत विसर्जित करत जलसंवर्धनाचा संदेश देण्यात आला असून, महाराष्ट्र–मध्यप्रदेशचे नाते अधिक दृढ झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सांगितले.

Goda to Narmada Jalyatra : अहिल्यादेवींच्या राजधानीत जलयात्रेचा मंगल समारोप; नर्मदा घाटावर भक्तिसागर
Goda to Narmada Jalyatra : अहिल्यादेवींच्या राजधानीत जलयात्रेचा मंगल समारोप; नर्मदा घाटावर भक्तिसागर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पवित्र भूमीतून सुरू झालेल्या आणि गोदावरी मातेच्या उगमस्थान श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान केलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा नुकताच महेश्वर येथे अत्यंत मंगल, भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात समारोप झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ही जलयात्रा आयोजित करण्यात आली. पाच दिवसांचा सुमारे ८५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून यात्रा महेश्वर येथे पोहोचली. नर्मदा घाटावर मंत्रघोष, नर्मदाष्टकमचा नाद, नर्मदेची महाआरती आणि वारकरी परंपरेतील जयघोष यामुळे समारोप सोहळा अविस्मरणीय ठरला.
या वेळी महाराष्ट्रातील १३० नद्यांमधून संकलित केलेले जल नर्मदेमध्ये विसर्जित करण्यात आले. तसेच श्रीक्षेत्र चौंडी येथील मातीचा कलश मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव व अहिल्यादेवींचे सोळावे वंशज श्रीमंत युवराज यशवंत होळकर बहाद्दूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, पणनमंत्री जयकुमार रावल, खासदार शंकर लालवाणी (इंदूर) व रामराव वडकुते, आमदार राजकुमार मेव, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, उद्धव महाराज मंडलिक आदी उपस्थित होते.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या शैलीत म्हणाले, “आज येथे दोन नद्यांचा महासंगम झाला आहे. त्याला तिसरी नदीही मिळाली आहे आणि ती म्हणजे अहिल्यादेवी!” पणनमंत्री जयकुमार रावल यांनी आभार मानले. जलयात्रा महेश्वर येथे पोहोचताच नागरिकांनी जलयात्रेचे जल्लोषात स्वागत केले. वारकऱ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्यास अभिवादन केले. मिरवणुकीदरम्यान विविध लोककला व खेळांचे सादरीकरण झाल्याने महेश्वरकर मंत्रमुग्ध झाले.

अहिल्यादेवींचे जीवनकार्य सर्वांसाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. यादव म्हणाले, “पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जीवनकार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. राज्यकर्त्या म्हणून त्यांची भूमिका अद्भुत आहे. परकीय आक्रमणाच्या काळातही त्या ठामपणे लढल्या. राज्य छोटे असले तरी त्यांचा निर्धार मोठा होता.”ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्राचे नाव घेतले तरी मी रोमांचित होतो. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश जणू जुळे भाऊ आहेत. अहिल्यादेवींमुळे आपले नाते होतेच परंतु आता गोदा ते नर्मदा जलयात्रेमुळे ते आणखी दृढ झाले.”

जलयात्रेच्या माध्यमातून जलसंवर्धन : मंत्री विखे पाटील

जलसंपदामंत्री विखे पाटील म्हणाले, “या जलयात्रेच्या माध्यमातून जलसंवर्धनासाठी लोकचळवळ उभी राहिली. महाराष्ट्रातील १३० नद्यांचे पाणी एकत्र करून जलसंवर्धन आणि पाण्याच्या योग्य वापराबाबत मोठी जागरूकता निर्माण झाली.”ते पुढे म्हणाले, “ही यात्रा केवळ धार्मिक स्वरूपाची राहिली नाही, तर पर्यावरण संरक्षण आणि जलसंधारणावर मोठे मंथन घडले. पाणी हे जीवन आणि ऊर्जा आहे, हा संदेश समाजापर्यंत पोहोचला.”

महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची यात्रा : मंत्री बावनकुळे

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी ही कल्पना मांडली तेव्हा ती एवढी व्यापक होईल, असे वाटले नव्हते. मात्र, ही यात्रा महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची यात्रा बनली आहे.”पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंस्कृती वाढवण्याचा विचार करत असून मुख्यमंत्री डॉ. मोहन यादवही त्याच धर्तीवर कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
Ahilyanagar Devendra Fadanvis Dr. Mohan Yadav Goda to Narmada Jalyatra Madhyapradesh Maharashtra Radhakrishna Vikhe Patil
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर संदेश कार्लेंची वर्णी

July 11, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.