Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चेनस्नॅचिंगचा थरार; दोन अटकेत, दोन फरार
अहिल्यानगर

Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चेनस्नॅचिंगचा थरार; दोन अटकेत, दोन फरार

Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंगचा थरार; दोन अटकेत, दोन फरार
Vinayak LandeBy Vinayak LandeMay 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260507 WA0008
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Indurikar Maharaj : अहिल्यानगर : इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात झालेल्या चेनस्नॅचिंग प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगरने धडाकेबाज कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली. आरोपींकडून ११.५ ग्रॅम सोन्यासह मोबाईल व मोटारसायकल असा एकूण २ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपी फरार आहेत.

Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंगचा थरार; दोन अटकेत, दोन फरार
Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंगचा थरार; दोन अटकेत, दोन फरार
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. लग्नाच्या सोहळ्यात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून पळ काढला होता.
याबाबत माहिती अशी की, या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला खात्रीशीर माहिती मिळाली की, हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी सागर सुरेश कांबळे (रा. श्रीरामपूर) याने साथीदारांसह केला असून चोरीतील सोन्याची वाटणी करण्यासाठी ते ममदापुर फाटा येथे मोटारसायकलवर येणार आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले.
https://jansattatimes.com/wp-content/uploads/2026/05/VID-20260507-WA0005.mp4
ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे सागर सुरेश कांबळे (वय ३२, रा. रमानगर, श्रीरामपूर) व बबलू उर्फ अब्दुल इब्राहिम पिंजारी (वय ३६, रा. वार्ड नं. २, श्रीरामपूर) अशी आहेत. चौकशीत त्यांनी हा गुन्हा इतर साथीदार आतिक आयुब उर्फ आरिफ शेख व सनी विलास ढोकणे (दोघेही फरार) यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून ११.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (१,४९,५०० रु.), दोन मोबाईल (७०,००० रु.) व मोटारसायकल (७०,००० रु.) असा एकूण २,८९,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यातील आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकाने केली आहे.
Ahilyanagar Crime Indurikar Maharaj Police Sangamner
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.