Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Yellow Alert : अहिल्यानगरला दोन दिवसांचा ‘येलो अलर्ट’; आज-उद्या वादळी पावसाचा इशारा
अहिल्यानगर

Yellow Alert : अहिल्यानगरला दोन दिवसांचा ‘येलो अलर्ट’; आज-उद्या वादळी पावसाचा इशारा

Yellow Alert : अहिल्यानगरला दोन दिवसांचा 'येलो अलर्ट'; आज-उद्या वादळी पावसाचा इशारा
Vinayak LandeBy Vinayak LandeJuly 3, 2026No Comments1 Min Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260622 WA00101
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Yellow Alert : अहिल्यानगर : भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ३ व ४ जुलै रोजी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.

Yellow Alert : अहिल्यानगरला दोन दिवसांचा 'येलो अलर्ट'; आज-उद्या वादळी पावसाचा इशारा
Yellow Alert : अहिल्यानगरला दोन दिवसांचा ‘येलो अलर्ट’; आज-उद्या वादळी पावसाचा इशारा
जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले की शेतकऱ्यांनी शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला किंवा आणण्याचे नियोजन असलेला माल पावसापासून सुरक्षित ठेवावा. जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे. नागरिक, शेतकरी बांधव यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

प्रशासनाच्या खबरदारीच्या सूचना

-मेघगर्जना व वीज चमकत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नका.
-वीजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर, टॉवर, धातूचे कुंपण आणि लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्यांपासून दूर राहा.
– वादळी वाऱ्याच्या वेळी झाडे, होर्डिंग्ज व जीर्ण इमारतींच्या परिसरात जाणे टाळा.
– धरण, नदी, ओढे व कालव्यांमध्ये उतरू नका; धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे टाळा.
-वादळ सुरू असताना शक्यतो घराबाहेर पडणे टाळा आणि विद्युत उपकरणांचा वापर मर्यादित ठेवा.
– आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रशासनाशी संपर्क साधा. मदतीसाठी ११२ व १०७७ या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधा.
.
Ahilyanagar Heavy Rain IMD Rain Thunderstorm Yellow Alert
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.