Nagardevle : अहिल्यानगर : प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत नागरदेवळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे गरोदर मातांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या उपक्रमात सरस्वती हॉस्पिटलचे डॉ. अमोल जाधव यांनी गरोदर मातांची सखोल आरोग्य तपासणी करून गर्भावस्थेदरम्यान घ्यावयाची काळजी, संतुलित आहार, नियमित तपासणीचे महत्त्व तसेच सुरक्षित प्रसूतीबाबत मार्गदर्शन केले.

