Ajit Pawar Plane crash Death : अहिल्यानगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अनंतात विलीन झाले आहेत. त्यांच्यावर बारामतीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ पवार आणि जय पवार या दाेन्ही मुलांनी अजित पवार यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी राज्यासह देशातील नेते बारामतीतील (Baramati) विद्या प्रतिष्ठान येथे उपस्थित हाेते. दरम्यान, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आराेप करणाऱ्या भारतीय जनता पक्षावर (BJP) ट्विटद्वारे निशाणा साधला. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडली आहे.
अवश्य वाचा ः विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी राज्याभरातून माेठा जनसमुदाय जमला हाेता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, नितीन गडकरी, रामदास आठवले यांच्यासह राज्य आणि देशातील नेते अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. अजित पवार यांच्या निधनानंतर आज भाजपने राज्यातील प्रमुख दैनिकांमध्ये अजित पवार यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या जाहिराती दिल्या आहेत. याच मुद्याला धरून संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
नक्की वाचा ः यंदाच्या प्रजासत्ताक दिनी पाच हजार विद्यार्थ्यांची एकाच वेळी कवायत
भाजपने अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पान भर जाहिराती दिल्या आहे. मात्र, त्याने काय होणार आहे. अजित पवारांवर भाजपमधील नेत्यांनी केलेले 70 हजार कोटींचे आरोप मागे घ्यावे, जेणे करून हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल’, असे संजय राऊत यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
