Sunetra Pawar News ः अहिल्यानगर ः आज राष्ट्रवादी पक्षातील आमदारांच्या बैठकीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधीचा कार्यक्रम अगदी साधेपणाने पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित हाेते. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहे. त्यांच्याकडे महत्त्वाची तीन खाती देण्यात आली. यावेळी राजभवनातील लाेकभवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी अजित दादा अमर रहेच्या घाेषणा दिल्याचे पाहयला मिळाले.
अवश्य वाचा ः Sunetra Pawar : राष्ट्रवादीत माेठी घडामाेड; सुनेत्रा पवार उद्याच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्य
तासुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे महायुती सरकारमध्ये सत्तेचे संतुलन राखण्याचा प्रयत्न झाला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पाेकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाला महायुतीत काेणताही विराेध झाला नाही.
नक्की वाचा ः Ajit Pawar Plane crash Death : संजय राऊत यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ
दरम्यान, आचार्य देवव्रत यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना क्रीडा व युवक, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक विकास ही तीन खाती दिली. मात्र, अर्थ आणि नियोजन खातं सध्या सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेलं नाही. अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे. येत्या 6 मार्चला मुख्यमंत्री फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.
