Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Preventive orders issued in Shirdi  : शिर्डीत भाविकांची पिळवणूक; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश जारी
अहिल्यानगर

Preventive orders issued in Shirdi  : शिर्डीत भाविकांची पिळवणूक; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश जारी

Preventive orders issued in Shirdi  : शिर्डीत भाविकांची पिळवणूक; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश जारी
Vinayak LandeBy Vinayak LandeFebruary 3, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
Preventive orders issued in Shirdi  : शिर्डीत भाविकांची पिळवणूक; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश जारी
Preventive orders issued in Shirdi  : शिर्डीत भाविकांची पिळवणूक; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश जारी
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Preventive orders issued in Shirdi  :  अहिल्यानगर :  शिर्डीत दररोज देश-विदेशातून लाखो साईभक्त दर्शनासाठी येतात.  परंतु, साईबाबा (Saibaba) समाधी मंदिर परिसरात दर्शनासाठी (Darshan) येणाऱ्या भाविकांची एंजटांकडून सर्रास पिळवणूक केली जाते. आता या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठाेस पावले उचलली आहेत. भाविकांची वाहने अडवून त्यांना विशिष्ट दुकानातूनच पूजासाहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या व खासगी पार्किंगचा आग्रह धरणाऱ्या एजंटांवर कलम १५२ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive orders issued in Shirdi) करण्यात येणार आहे, असे आदेश शिर्डी (Shirdi) विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांनी जारी केले आहेत. त्यामुळे परिसरातील एंजंट चांगलेच धास्तावले आहे.

अवश्य वाचा :  संजय राऊत यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ


शिर्डी शहरात अनेक ठिकाणी खासगी व्यक्तींकडून सार्वजनिक रस्त्यावर भाविकांची वाहने बेकायदेशीरपणे अडवली जातात. भाविकांना खासगी पार्किंगच्या ठिकाणी वाहने घेण्याचा आग्रह धरला जातो. तसेच विशिष्ट दुकानांतून अव्वाच्या सव्वा दरात पूजासाहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जाते. यातून भाविकांची मोठी आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अनेकदा भाविकांना दमदाटी, शिवीगाळ व धक्काबुक्की करण्याचे प्रकारही घडले आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने हे आदेश जारी केले आहेत.
नक्की वाचा : यंदाच्या प्रजासत्ताक दिनी पाच हजार विद्यार्थ्यांची एकाच वेळी कवायत
या आदेशानुसार शिर्डी गावाच्या बाहेरील किंवा गावातील सार्वजनिक रस्ते, चौक, बसथांबे व प्रवेश मार्गावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने थांबवून त्यांची दिशाभूल करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीने स्वतःला देवस्थान ट्रस्ट किंवा प्रशासनाचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवू नये, भोजन, निवास किंवा दर्शनाच्या नावाखाली मध्यस्थीचे व्यवहार करणाऱ्यांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
Administration Agent Darshan Devotee Preventive orders issued in Shirdi Saibaba Shirdi
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर संदेश कार्लेंची वर्णी

July 11, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.