Crime News : अहिल्यानगर : शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील श्रीरापुरात एका शिक्षकाने चार अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैगिंक अत्याचार (sexual assault) केल्याप्रकरणी पाेक्साे कायद्यांतर्गत श्रीरामपूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शाळेतील सुरक्षतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. आराेपीला पाेलिसांनी (Police)अटक केली असून महिला अधिकाऱ्याकडून चोकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती आहे.
अवश्य वाचा : धक्कादायक ! शेगावसारख्या पवित्र तीर्थक्षेत्री दर्शनासाठी आलेल्या तरुणीवर लॉजवर बलात्कार
राज्यात विद्येच्या मंदिरात मुलींसोबत वारंवार गैरवर्तनाच्या घटना घडत आहेत. याबाबत माहिती अशी की, एका विद्यार्थिनीने लैगिंक अत्याचाराबाबत कुटुंबीयांना सांगितल्यानंतर या प्रकरणाला खऱ्या अर्थाने ताेंड फुटले. त्यानंतर संबंधित शिक्षकाचा गैरप्रकार उघडकीस आला. या संबंधित शिक्षकाची तीन ते चार अल्पवयीन मुलींवर वाईट नजर हाेती. त्यानंतर त्याच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचा त्यावर आराेप करण्यात आला. त्या शिक्षकाविराेधात श्रीरामपूर पाेलीस ठाण्यात पाेक्साे अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
नक्की वाचा : गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल; ‘या’ जिल्ह्यातून आठ जण हद्दपार
सचिन गाेणारकर (वय ३५, रा. गाेणार्क, ता. कंधार, जि. नांदेड, हल्ली मुक्काम वार्ड न. ७, श्रीरामपूर ) असे आराेपीचे नाव आहे. या प्रकरणाची सखाेल चाेकशी सुरू असून संबंधित शिक्षकाने आणखी काही प्रकार केले आहे का ? याची माहिती घेतली जात आहे. शिक्षकाने असे गैरकृत्य केल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे, अशा वारंवार घडणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने ठाेस पावले उचलावीत, अशी मागणी् नागरिकांकडून हाेत आहे.
हेही वाचा ः ब्लॅक फिल्म’विरोधात पोलिसांची कारवाई; ४५८ वाहनांला ठोठावला लाखोंचा दंड
