Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»International Yoga Day 2026 : सामूहिक योगासनांनी दिला निरोगी जीवनाचा मंत्र; नागरदेवळेत योग दिन उत्साहात
अहिल्यानगर

International Yoga Day 2026 : सामूहिक योगासनांनी दिला निरोगी जीवनाचा मंत्र; नागरदेवळेत योग दिन उत्साहात

Vinayak LandeBy Vinayak LandeJune 21, 2026Updated:June 21, 2026No Comments1 Min Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260621 WA0045
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

International Yoga Day 2026 : अहिल्यानगर : नगर तालुक्यातील नागरदेवळे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (२१ जून) जागतिक योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नागरदेवळे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवक तसेच नागरिकांनी सहभाग घेत विविध योगासने व प्राणायामाचा सराव केला.

🧘‍♂️International Yoga Day 2026 : सामूहिक योगासनांनी दिला निरोगी जीवनाचा मंत्र; नागरदेवळेत योग दिन उत्साहात
🧘‍♂️International Yoga Day 2026 : सामूहिक योगासनांनी दिला निरोगी जीवनाचा मंत्र; नागरदेवळेत योग दिन उत्साहात
योग दिनाच्या कार्यक्रमात सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. विशाल घंगाळे, ग्रामपंचायत अधिकारी नेताजी भाबड, आरोग्य सेवक सचिन चितळे, गटप्रवर्तक कांचन शेंडे, आशासेविका कामिनी खेतमाळीस, अश्विनी खेतमाळीस, रजिया शेख, आशा धाडगे, वृषाली धाडगे, सुनीता कड आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी विविध योगासने आणि प्राणायाम करून निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. योगामुळे शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक संतुलन राखण्यास मदत होते, असे मार्गदर्शनही करण्यात आले.
प्राचीन भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी असलेल्या योगाचे महत्त्व आज संपूर्ण जगाने स्वीकारले आहे. धकाधकीच्या जीवनात आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योग हा प्रभावी मार्ग असून नियमित योगाभ्यासातून शरीर व मन दोन्ही निरोगी राहते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
जागतिक स्तरावर योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. यानिमित्त नागरदेवळे येथे आयोजित कार्यक्रमातून योगाबाबत जनजागृती करत निरोगी जीवनाचा संदेश देण्यात आला.
Ahilyanagar International Yoga Day 2026 Maharashtra Nagardevale PHC
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.