NEET Re-Exam 2026 : अहिल्यानगर : राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत (NTA) रविवार (ता. २१ जून २०२६ ) रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात नीट (NEET-2026) पुनर्परीक्षा आयोजित करण्यात आली असून, जिल्ह्यातील १२ परीक्षा केंद्रांवर एकूण ५ हजार ३८५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत होणार असून, दिव्यांग प्रवर्गातील पात्र उमेदवारांसाठी परीक्षा सायंकाळी ६.२० वाजेपर्यंत चालणार आहे.

