Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी
अहिल्यानगर

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी

वारकऱ्यांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
Vinayak LandeBy Vinayak LandeJune 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
vari 2 202010503048
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Ashadhi Wari 2026 : अहिल्यानगर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी
Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आषाढी वारी नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेचे प्रतीक असून लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात. त्यामुळे वारी मार्गावरील सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून सुरक्षित, स्वच्छ आणि सुरळीत वारीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, “जिल्ह्यातून आणि इतर भागांतून अनेक दिंड्या पंढरपूरकडे जात असतात. वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून ते खड्डेमुक्त करावेत. दिंडी मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतूक व्यवस्थापन चोखपणे करावे. मुक्कामस्थळी चोरी, गैरप्रकार अथवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेऊन पोलिसांची गस्त वाढवावी.
दिंडी मार्गावरील सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्नानगृहे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण तसेच अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
वारकऱ्यांसाठी आवश्यक वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, औषधसाठा आणि आपत्कालीन उपचार सुविधा उपलब्ध ठेवण्याबरोबरच महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्न रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
Administration Ashadhi Ekadashi Ashadhi Wari Maharashtra Radhakrishna Vikhe Patil
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर संदेश कार्लेंची वर्णी

July 11, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.