Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Mahavitaran : महावितरणकडून मान्सूनपूर्व कामांना गती; वीजबंद वेळेत बदल
अहिल्यानगर

Mahavitaran : महावितरणकडून मान्सूनपूर्व कामांना गती; वीजबंद वेळेत बदल

Mahavitaran : महावितरणकडून मान्सूनपूर्व कामांना गती; वीजबंद वेळेत बदल
Vinayak LandeBy Vinayak LandeApril 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260426 WA0007
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Mahavitaran : अहिल्यानगर : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी महावितरणकडून राज्यभरात मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे वेगात सुरू आहेत. मात्र, दुपारच्या कडक उन्हात वीज बंद राहिल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याने, ही सर्व कामे सकाळी ७ ते ११ या वेळेत करण्याचे निर्देश महावितरण मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.

Mahavitaran : महावितरणकडून मान्सूनपूर्व कामांना गती; वीजबंद वेळेत बदल
Mahavitaran : महावितरणकडून मान्सूनपूर्व कामांना गती; वीजबंद वेळेत बदल
महावितरणकडून पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार आणि वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. साधारणतः ही कामे मे महिन्याच्या अखेरीस पूर्णत्वास जातात. मात्र, सध्या काही ठिकाणी सकाळी १० ते दुपारी २ किंवा ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवून कामे सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. ही गैरसोय टाळण्यासाठी मुख्यालयाने आता स्पष्ट निर्देश देत, संबंधित दिवशी वीजवाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम फक्त सकाळी ७ ते ११ या वेळेतच पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

वीजपुरवठा व एसएमएसद्वारे सूचना

पूर्वनियोजित देखभाल-दुरुस्तीचे काम करताना शक्य असेल तेथे पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देणे, तसेच संबंधित वीजग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे आणि प्रसिद्धी माध्यमांद्वारे पूर्वसूचना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मान्सूनपूर्व होणारी कामे?

वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडणे, तुटलेले पीन व डिस्क इन्सुलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रे, फिडर पिलर व रिंगमेन युनिटचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्टरेशन व ऑइल टॉपिंग अप, रोहित्र वितरण पेटीची दुरुस्ती, नादुरुस्त लाईटनिंग अरेस्टर बदलणे, वीजखांब व तारांचे मजबुतीकरण, तारांमधील झोल काढणे, गंजलेले किंवा खराब वीजखांब बदलणे, जुन्या वीजतारा बदलणे, फिडर पिलरची साफसफाई व आवश्यकतेनुसार इन्सुलेशन स्प्रे मारणे, उच्च व लघुदाब वीजतारांना गार्डिंग करणे यासह उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, पॉवर ट्रान्सफॉर्मरची देखभाल व ऑइल टॉपिंग अप आदी कामे सुरू आहेत.
Ahilyanagar Citizen Customer Maharashtra Mahavitran
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Bakri Eid २०२६ : ‘बकरी ईद’चा सण उत्साहात पण नियमांच्या चौकटीतच; जिल्हाधिकाऱ्यांचा स्पष्ट इशारा

May 22, 2026

Cheque Bounce : चेक बाऊन्स प्रकरणी कठोर निकाल; महिलेला तुरुंगवास, लाखोंची नुकसानभरपाई

May 20, 2026

Crime : अहिल्यानगर हादरलं; पुतण्याचा खून करून घर साफ; २४ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश

May 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Bakri Eid २०२६ : ‘बकरी ईद’चा सण उत्साहात पण नियमांच्या चौकटीतच; जिल्हाधिकाऱ्यांचा स्पष्ट इशारा

May 22, 2026

Cheque Bounce : चेक बाऊन्स प्रकरणी कठोर निकाल; महिलेला तुरुंगवास, लाखोंची नुकसानभरपाई

May 20, 2026

Crime : अहिल्यानगर हादरलं; पुतण्याचा खून करून घर साफ; २४ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश

May 17, 2026

Ahilyanagar News : एलसीबीचा स्ट्राईक; बार-दुकान फोडणारी टोळी जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.