Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Petrol Diesel News : जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल
अहिल्यानगर

Petrol Diesel News : जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल

Petrol Diesel News : जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल
Vinayak LandeBy Vinayak LandeMarch 26, 2026Updated:March 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260325 WA00471
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Petrol Diesel News : ​अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व गॅसचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जो कुणी इंधन तुटवड्याच्या अफवा पसरून नागरिकांची नाहक दिशाभूल करत आहे, अशा लोकांवर थेट गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिला.

Petrol Diesel News : जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल
Petrol Diesel News : जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल
इंधनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली, पोलीस अधीक्षक व पुरवठा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी म्हणाले, “इंधनाची वितरण व्यवस्था अत्यंत सुरळीत सुरू आहे. सध्या सोशल मीडिया व व्हॉट्सॲपवर इंधन तुटवड्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या व दिशाभूल करणाऱ्या आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, पॅनिक होऊन पेट्रोल पंपांवर विनाकारण गर्दी करू नये,” असे आवाहनही त्यांनी केले.
Petrol Diesel News : जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल
Petrol Diesel News : जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल

जिल्ह्यातील इंधन साठ्याची वस्तुस्थिती

​प्रशासनाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार जिल्ह्यातील इंधन साठ्याची वस्तुस्थिती अत्यंत समाधानकारक आहे. पेट्रोलची (MS) जिल्ह्याची दररोजची गरज ३०८ किलोलिटर (KL) इतकी असून, सध्या ८४६ किलोलिटर इतका मुबलक साठा उपलब्ध आहे. तसेच, डिझेलची (HSD) दररोजची गरज ६८९ किलोलिटर (KL) असताना, सध्या १४७१ किलोलिटर इतका साठा उपलब्ध आहे.

इंधनाची अनावश्यक साठेबाजी करू नये : जिल्हा प्रशासन

​जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा निर्माण झालेला नसल्यामुळे नागरिकांनी इंधनाची अनावश्यक साठेबाजी करू नये. खोट्या अफवांवर विश्वास ठेवून विनाकारण पेट्रोल पंपांवर रांगा लावणे टाळावे. इंधनाचा पुरवठा नियमितपणे सुरू असल्याने नागरिकांनी शांतता व संयम राखून जिल्हा प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Administration Ahilyanagar Fuel Jilhadhikari Petrol Diesel News Police Social Social media
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर संदेश कार्लेंची वर्णी

July 11, 2026

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.