Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»Drone : गोव्याच्या अधिकाऱ्यांना आता महाराष्ट्रात मिळणार ‘ड्रोन’चे प्रशिक्षण
महाराष्ट्र

Drone : गोव्याच्या अधिकाऱ्यांना आता महाराष्ट्रात मिळणार ‘ड्रोन’चे प्रशिक्षण

Drone : गोव्याच्या अधिकाऱ्यांना आता महाराष्ट्रात मिळणार 'ड्रोन'चे प्रशिक्षण
Vinayak LandeBy Vinayak LandeFebruary 4, 2026Updated:February 4, 2026No Comments1 Min Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260204 WA0036
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Drone : अहिल्यानगर : सध्या शेती फवारणी, जमिनीची मोजणी, सरकारी पाहणी व व्हिडिओग्राफीसाठी ड्रोनचा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे या क्षेत्रात कुशल लोकांची मोठी गरज आहे. महाराष्ट्रातील’अमृत’ संस्थेचा ड्रोनचा अनुभव आणि दर्जा पाहून, गोवा सरकारने दखल घेऊन त्यांच्या 30 अधिकाऱ्यांना अमृत संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याचे संचालक विजय सक्सेना यांनी तसे पत्रच संस्थेला पाठवले आहे.

‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) ही पुणे मुख्यालय असलेली एक स्वायत्त संस्था आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ही संस्था काम करते. याचाच एक भाग म्हणून ‘अमृत ड्रोन मिशन’ चालवले जाते. विशेष म्हणजे, हे उच्च दर्जाचे प्रशिक्षण गरजू विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत असते. आतापर्यंत शंभरहून अधिक जणांनी याचा लाभ घेतला असून त्यांना चांगला रोजगारही मिळाला आहे.

‘अमृत’कडून ड्रोनचे दर्जेदार धडे

‘अमृत’तर्फे दिले जाणारे ड्रोन प्रशिक्षण अत्यंत दर्जेदार असल्याने गोवा सरकारने आपल्या ३० अधिकाऱ्यांना या प्रशिक्षणासाठी निवडले आहे. तसा अधिकृत प्रस्तावच गोवा सरकारने मंजूर केल्याची माहिती ‘अमृत’चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी दिली आहे. ​राज्यातील जास्तीत जास्त तरुणांनी अमृत संस्थेच्या या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपले करियर घडवावे, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.
Amrit Sanstha Drone employment Govt. of Goa Maharashtra Training
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

IMD weather update : विजांच्या कडकडाटासह काही भागात पावसाच्या सरी बरसणार; हवामान खात्याचा अंदाज

April 18, 2026

Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन

April 16, 2026

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

April 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

IMD weather update : विजांच्या कडकडाटासह काही भागात पावसाच्या सरी बरसणार; हवामान खात्याचा अंदाज

April 18, 2026

Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन

April 16, 2026

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

April 14, 2026

Women’s Self-Help Groups : बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ झेप; अहिल्यानगरमध्ये विक्रमी कर्जवाटप

April 12, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.