Radhakrishna Vikhe Patil : अहिल्यानगर : टंचाईच्या काळात नागरिकांना पाणी, पशुधनाला चारा आणि शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देताना प्रशासनाने संवेदनशीलता आणि समन्वयाने काम करावे. सुविधा देण्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सदस्य विवेक कोल्हे, आमदार आशुतोष काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अपर जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

