Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Shivaji Maharaj History : शिवरायांची अचूक रणनिती; प्रतापगडावर अफझलखानाचा अंत !
अहिल्यानगर

Shivaji Maharaj History : शिवरायांची अचूक रणनिती; प्रतापगडावर अफझलखानाचा अंत !

प्रतापगडावर अफझलखानाचा वध करून स्वराज्याचा निर्णायक अध्याय लिहिणाऱ्या शिवरायांची रणनिती प. पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी शिवचरित्र कथेतून उलगडली.
Vinayak LandeBy Vinayak LandeOctober 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20261002 WA0004
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Shivaji Maharaj History : अहिल्यानगर : प्रतापगडावर अफझलखानाचा वध करून स्वराज्याचा निर्णायक अध्याय लिहिणाऱ्या शिवरायांची रणनिती प. पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी शिवचरित्र कथेतून उलगडली. अफझलखान वधाचा थरारक प्रसंग कथन करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि मावळ्यांची निष्ठा प्रभावीपणे मांडली.

श्रीरामकृष्ण सेवा ट्रस्टच्या वतीने नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा सोहळ्याचे तृतीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्रा. नानासाहेब जाधव, ट्रस्टचे अध्यक्ष नंदलाल मणियार, उपाध्यक्ष मोहनलाल मानधना, सचिव सुरेश चांडक, कोषाध्यक्ष मगनभाई पटेल यांच्यासह माजी महापौर सुरेखा कदम, माजी उपमहापौर गीतांजली काळे, संभाजी कदम, शरद झंवर, रामेश्वर बिहाणी, बजरंग दरक, हर्षल शहा, पुरुषोत्तम पटेल, मधुसूदन सारडा, प्रकाश गांधी आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.

स्वामी गोविंददेवगिरी महाराज म्हणाले, “महान ध्येय समोर असताना तडकाफडकी निर्णय घेता कामा नये. भावनेच्या भरात केलेली कामे विजय मिळवून देत नाहीत. आवेशाने कार्य नासते.” अफझलखानाच्या मोहिमेचा संदर्भ देताना त्यांनी तत्कालीन परिस्थिती, शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि शत्रूच्या हालचालींचा अचूक अंदाज घेऊन आखलेली रणनिती यांचे प्रभावी वर्णन केले.

शिवाजी महाराजांची आई जिजाऊ, देवी भवानी आणि शंभू महादेवावर असलेली श्रद्धा तसेच हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी मावळ्यांनी केलेला त्याग यावरही त्यांनी प्रकाश टाकला. नेतोजी पालकर, तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे, कान्होजी जेधे आदी विश्वासू सहकाऱ्यांना सोबत घेऊन महाराजांनी अफझलखानाच्या मोहिमेला प्रत्युत्तर देण्यासाठी आखलेली योजना त्यांनी सांगितली.
अफझलखानाचा अहंकार फुलविण्यासाठी शिवाजी महाराजांनी त्याला पाठविलेल्या पत्राचा संदर्भ देत स्वामीजींनी खानाची मानसिकता आणि महाराजांची रणनीती स्पष्ट केली. प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या भेटीचा प्रसंग सांगताना त्यांनी अफझलखानाने आलिंगनाच्या बहाण्याने दगाबाजी केल्यानंतर भवानी देवीच्या आज्ञेने छत्रपती शिवाजी महाराजांनी ३२ दातांचा बोकड मारला आणि अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला,” असे
शिवाजी महाराजांनी केलेल्या प्रतिकाराचे थरारक वर्णन केले. जिवा महालाने सय्यद बंडाचा केलेला प्रतिकार आणि त्यानंतर मावळ्यांनी केलेली कारवाई यामुळे प्रतापगडावरील विजयाचा प्रसंग श्रोत्यांसमोर जिवंत झाला.

“अफझलखानाच्या वधानंतरही शिवाजी महाराज थांबले नाहीत. पुढील मोहिमेसाठी ते तातडीने निघाले आणि अल्पावधीत अनेक किल्ले जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली,” असे सांगत स्वामीजींनी शिवरायांच्या ध्येयवेड्या नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले.

दरम्यान, श्री रामकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांची स्तुतिगीते सादर केली. पुष्पा औटी यांनी विद्यार्थ्यांकडून ही गीते बसवून घेतल्याने त्यांचे कौतुक झाले. व्यासपीठ व प्रवेशद्वाराचे आकर्षक डिझाईन साकारणारे कलाकार मोहन गुंडू यांचा सन्मान करण्यात आला. नंदनवन उद्योग समूहाचे संजय जाधव यांनी स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थितांचे स्वागत केले. मुक्ता देवकर यांनी सूत्रसंचालन केले.

पोवाड्याच्या दमदार साथीने स्वामीजींनी शिवचरित्राचे निरूपण केले. शिवरायांच्या पराक्रमाचे प्रसंग ऐकताना उपस्थित शिवप्रेमींमध्ये वीरश्रीची भावना निर्माण झाली. कार्यक्रमास शहरासह उपनगरातून हिंदू धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Afjal Khan Vadh Ahilyanagar Chhatrapati Shivaji Maharaj Maharashtra Pratapgarh Shivaji Maharaj History Swami Govinddev Giri Maharaj
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Hospitalization : हॉस्पिटल्स बाराही महिने हाऊसफुल्ल; जीवनशैलीवर आत्मचिंतन हवे!

October 22, 2026

Ahilyanagar Farmers : शेतकऱ्यांसाठी दिलासा; कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीत ४,४१५ नावे !

October 14, 2026

Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म

October 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Hospitalization : हॉस्पिटल्स बाराही महिने हाऊसफुल्ल; जीवनशैलीवर आत्मचिंतन हवे!

October 22, 2026

Ahilyanagar Farmers : शेतकऱ्यांसाठी दिलासा; कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीत ४,४१५ नावे !

October 14, 2026

Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म

October 12, 2026

Shiv Charitra Katha : शिवाजी महाराज केवळ राजे नव्हे, तर राष्ट्रधर्माचे महानायक : स्वामी गोविंददेवगिरी महाराज

October 5, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.