Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचे स्वराज्य जपा; राष्ट्रनिष्ठेची ज्योत मनामनात तेवत ठेवा
अहिल्यानगर

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचे स्वराज्य जपा; राष्ट्रनिष्ठेची ज्योत मनामनात तेवत ठेवा

आजच्या युवकांनी त्यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेत राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन प. पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी केले.
Vinayak LandeBy Vinayak LandeOctober 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20261001 WA0033
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Chhatrapati Shivaji Maharaj : अहिल्यानगर : छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हिंदूंचे साम्राज्य आणि हिंदवी स्वराज्य जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. शिवरायांनी समाजात स्वाभिमान, संघटन आणि राष्ट्रनिष्ठेची भावना निर्माण केली. आजच्या युवकांनी त्यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेत राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन प. पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी केले.

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचे स्वराज्य जपा; राष्ट्रनिष्ठेची ज्योत मनामनात तेवत ठेवा
Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचे स्वराज्य जपा; राष्ट्रनिष्ठेची ज्योत मनामनात तेवत ठेवा

श्रीरामकृष्ण सेवा ट्रस्टच्या वतीने नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा सोहळ्याच्या द्वितीय पुष्पात ते बोलत होते. यावेळी महापौर ज्योती गाडे, सुरेखा मणियार, तनया जाधव, राज जाधव यांच्यासह ट्रस्टचे अध्यक्ष नंदलाल मणियार, उपाध्यक्ष मोहनलाल मानधना, सचिव सुरेश चांडक, कोषाध्यक्ष मगनभाई पटेल, स्वागताध्यक्ष संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचे स्वराज्य जपा; राष्ट्रनिष्ठेची ज्योत मनामनात तेवत ठेवा
Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचे स्वराज्य जपा; राष्ट्रनिष्ठेची ज्योत मनामनात तेवत ठेवा

स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले, “विजापूरच्या आदिलशाही दरबारात अवघ्या १२व्या वर्षी बाल शिवाजी ताठ मानेने उभे राहिले. हे धैर्य त्यांना राजमाता जिजाऊंनी दिलेल्या राष्ट्रसंस्कारांतून मिळाले.” आदिलशहापुढे मान तुकवण्यास नकार देणाऱ्या शिवरायांच्या अंतरंगातील स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा आजच्या युवकांसाठी स्फूर्तीस्थान ठरावी, असे त्यांनी सांगितले.

जिजाऊंनी बाल शिवाजींमध्ये संघटन कौशल्य आणि न्यायबुद्धी रुजवली. मावळ्यांना सोबत घेत जीवाला जीव देणारे सहकारी उभे करून शिवरायांनी संघटनशक्तीचा आदर्श घालून दिला. १५ एप्रिल १६४५ रोजी वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी हिंदू साम्राज्य स्थापनेची शपथ घेतली, असा उल्लेख स्वामीजींनी केला.

शिवरायांनी स्वराज्याला केवळ भोसले किंवा मराठ्यांचे राज्य मानले नाही, तर ते शंभू महादेवांचे राज्य असल्याची भावना त्यांच्या मनात होती. बहिर्जी नाईक यांच्यासारख्या हेरांनी स्वराज्याच्या उभारणीत दिलेले योगदानही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिवचरित्र समाजासमोर प्रभावीपणे मांडणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख करताना स्वामीजींनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचाही संदर्भ दिला. शिवाजी महाराजांचे कार्य हे स्वाभिमान, संघटन आणि राष्ट्रधर्माची प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी महापौर ज्योती गाडे यांनी अहिल्यानगर शहरात प्रथमच शिवाजी महाराज चरित्र कथा सोहळ्याचे आयोजन करून श्रीरामकृष्ण सेवा ट्रस्टने मौलिक कार्य केल्याचे सांगितले. युवकांनी मोठ्या संख्येने या कथेला उपस्थित राहून शिवचरित्रातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीरामकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांची स्तुतिगीते सादर केली. कार्यक्रमास शहर व उपनगरातील शिवप्रेमी, हिंदू धर्मप्रेमी, महिला आणि लहानग्यांची मोठी उपस्थिती होती. शरद झंवर, रामेश्वर बिहाणी, मिलिंद चवंडके, रामेश्वर मणियार, किरण मणियार, हिरालाल पटेल, विनोद पटेल, राजूभाई पटेल, पुरुषोत्तम नावंदर, दत्ता जाधव, रविंद्र गुजराथी आदी मान्यवर उपस्थित होते.

Administration Ahilyanagar Chhatrapati Shivaji Maharaj Maharashtra Swami Govinddev Giri Maharaj
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Hospitalization : हॉस्पिटल्स बाराही महिने हाऊसफुल्ल; जीवनशैलीवर आत्मचिंतन हवे!

October 22, 2026

Ahilyanagar Farmers : शेतकऱ्यांसाठी दिलासा; कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीत ४,४१५ नावे !

October 14, 2026

Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म

October 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Hospitalization : हॉस्पिटल्स बाराही महिने हाऊसफुल्ल; जीवनशैलीवर आत्मचिंतन हवे!

October 22, 2026

Ahilyanagar Farmers : शेतकऱ्यांसाठी दिलासा; कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीत ४,४१५ नावे !

October 14, 2026

Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म

October 12, 2026

Shiv Charitra Katha : शिवाजी महाराज केवळ राजे नव्हे, तर राष्ट्रधर्माचे महानायक : स्वामी गोविंददेवगिरी महाराज

October 5, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.