Chhatrapati Shivaji Maharaj : अहिल्यानगर : “विश्वाचे मांगल्य साकारणारा हिंदू धर्म केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे टिकला. विश्वमांगल्याचा विचार हा भारत देशाचा स्थायीभाव आहे,” असे प्रतिपादन प. पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी केले. श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टच्या वतीने नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याचा प्रारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाला.

