Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Ahilyanagar : आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी संघटनेचा एल्गार; जिल्हा कार्यकारिणीला नवे चेहरे, नवे नेतृत्व
अहिल्यानगर

Ahilyanagar : आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी संघटनेचा एल्गार; जिल्हा कार्यकारिणीला नवे चेहरे, नवे नेतृत्व

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करताना ११ तालुक्यांच्या तालुकाध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर जिल्हा कार्यकारिणीचेही पुनर्गठन करण्यात आले.
Vinayak LandeBy Vinayak LandeSeptember 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260928 WA0003
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Ahilyanagar : अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या अहिल्यानगर शाखेची सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करताना ११ तालुक्यांच्या तालुकाध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर जिल्हा कार्यकारिणीचेही पुनर्गठन करण्यात आले.

Ahilyanagar : आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी संघटनेचा एल्गार; जिल्हा कार्यकारिणीला नवे चेहरे, नवे नेतृत्व
Ahilyanagar : आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी संघटनेचा एल्गार; जिल्हा कार्यकारिणीला नवे चेहरे, नवे नेतृत्व

माऊली सांस्कृतिक कार्यालय, अहिल्यानगर येथे शनिवार, २६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त आरोग्य पर्यवेक्षक मिलिंद कांबळे होते. जिल्हाध्यक्ष गोरक्ष शेळके, राज्य सचिव किरण खेम्हाळसकर तसेच राज्य प्रतिनिधी व माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डीसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभेत जिल्ह्यातील आरोग्य विभागातील विविध संवर्गांतील कर्मचाऱ्यांच्या समस्या, प्रलंबित मागण्या आणि त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाठपुराव्याचा आढावा घेण्यात आला. कर्मचाऱ्यांना आपल्या अडचणी व प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. राज्य सचिव किरण खेम्हाळसकर यांनी राज्यस्तरावर कर्मचारी हितासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. मनोहर डीसले यांनी जिल्हास्तरावर संघटनेने केलेल्या कामांचा व सोडविलेल्या प्रश्नांचा आढावा घेतला.
सभेस जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आरोग्य विभागातील महिला व पुरुष कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्याध्यक्ष सोपान अर्जुन शेटे यांनी केले. नवनिर्वाचित कोषाध्यक्ष योगेंद्र पालवे यांनी उपस्थितांचे व सभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

जिल्हा कार्यकारिणीचे पुनर्गठन

सभेत जिल्हा कार्यकारिणीतील रिक्त पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. योगेंद्र पालवे – कोषाध्यक्ष, नीलेश गाडेकर – सचिव, योगेश ठाणगे – सहसचिव, सुबोध भोसले – विभागीय कार्याध्यक्ष, सचिन चितळे, रवींद्र काळे, सुनील पुंड, बाळासाहेब जाधव व योगेश तिकोने – उपाध्यक्ष, तर विशाल खंडागळे – संघटक, नारायण बोराडे व बाळासाहेब फटांगरे – सल्लागार आणि भूषण शिंदे – सहकोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

११ तालुकाध्यक्षांची निवड

जिल्ह्यातील १४ पैकी ११ तालुक्यांच्या तालुकाध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यात आली. कल्याणी हेम्बाडे (नगर), शिवाजी जवणे (नेवासा), प्रशांत नरवडे (पाथर्डी), दीपक एकबोटे (राहाता), अनिकेत कंढारे (श्रीरामपूर), अरविंद काळे (संगमनेर), आदित्य दगडखैर (शेवगाव), प्रदीप गाढवे (श्रीगोंदा), केशव डोळे (जामखेड), राहुल साळवे (कोपरगाव) आणि किरण दळवी (राहुरी) यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाली. उर्वरित तीन तालुक्यांच्या अध्यक्षांची निवड लवकरच करण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

– आरोग्य सेवक, सेविका व सहाय्यकांचे पदनाम बदलावे
– फिरती भत्त्यात वाढ करावी
– आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी मर्यादित स्पर्धा परीक्षा सुरू करावी
– सर्व पदांच्या जॉब चार्टमध्ये आवश्यक बदल करावेत
– ‘८५०८’ हेडमधील वेतन तातडीने मिळण्यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करावा

Ahilyanagar EmployeeUnion HealthDepartment HealthEmployees Maharashtra ZillaParishad
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Hospitalization : हॉस्पिटल्स बाराही महिने हाऊसफुल्ल; जीवनशैलीवर आत्मचिंतन हवे!

October 22, 2026

Ahilyanagar Farmers : शेतकऱ्यांसाठी दिलासा; कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीत ४,४१५ नावे !

October 14, 2026

Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म

October 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Hospitalization : हॉस्पिटल्स बाराही महिने हाऊसफुल्ल; जीवनशैलीवर आत्मचिंतन हवे!

October 22, 2026

Ahilyanagar Farmers : शेतकऱ्यांसाठी दिलासा; कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीत ४,४१५ नावे !

October 14, 2026

Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म

October 12, 2026

Shiv Charitra Katha : शिवाजी महाराज केवळ राजे नव्हे, तर राष्ट्रधर्माचे महानायक : स्वामी गोविंददेवगिरी महाराज

October 5, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.