Amarkantak : चिखली : भगवान श्रीशंकराने निर्माण केलेल्या पवित्र अमरकंटक पर्वतावरील नर्मदा तटावर आत्मदर्शनाचे परम सुख अनुभवता येते. नर्मदा तट हा साधना, जप आणि ध्यानासाठी अत्यंत पवित्र असून भाविकांनी या पावन भूमीचा आध्यात्मिक आनंद लुटावा, असे आवाहन नर्मदा पुराणचे कथाकार मिलिंद महाराज चवंडके यांनी केले.

चिखली येथील जागृत हनुमान मंदिराच्या सभामंडपात श्रावण महिन्यानिमित्त प्रथमच आयोजित नर्मदा कथा निरूपण सोहळ्यातील चतुर्थ पुष्प गुंफताना ते बोलत होते.

