Narmada Mahima : चिखली : कोट्यवधी ऋषींच्या तपश्चर्येने पावन झालेल्या नर्मदामाईच्या महिम्याने चिखलीतील भक्तिरसाला नवी उंची मिळाली. नर्मदा पुराणाच्या तृतीय पुष्पात मिलिंद महाराज चवंडके यांनी नर्मदामाई ही भक्तांच्या मनोरथांची सिद्धिदात्री असल्याची महती उलगडली.

जागृत हनुमान मंदिर येथील सभामंडपात श्रावण महिन्यानिमित्त प्रथमच आयोजित नर्मदा कथा निरूपण सोहळ्याचे तृतीय पुष्प गुंफताना ते बोलत होते.

