Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»Narmada Purana Katha : श्रावणात नर्मदा चरित्राचे श्रवण म्हणजे पुण्याची पर्वणी !
महाराष्ट्र

Narmada Purana Katha : श्रावणात नर्मदा चरित्राचे श्रवण म्हणजे पुण्याची पर्वणी !

नर्मदा ही केवळ नदी नव्हे, तर जीवांचे पापक्षालन करणारी परमेश्वराची विभूती आहे,
Vinayak LandeBy Vinayak LandeAugust 27, 2026Updated:August 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
Narmada Purana Katha : श्रावणात नर्मदा चरित्राचे श्रवण म्हणजे पुण्याची पर्वणी !
Narmada Purana Katha : श्रावणात नर्मदा चरित्राचे श्रवण म्हणजे पुण्याची पर्वणी !
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Narmada Purana Katha : चिखली : श्रावणातील नर्मदा पुराणाच्या भक्तिधारेने चिखलीत अध्यात्माचा सोहळा रंगला. नर्मदा मातेच्या चरित्राचे श्रवण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. “नर्मदा ही केवळ नदी नव्हे, तर जीवांचे पापक्षालन करणारी परमेश्वराची विभूती आहे,” असे सांगत मिलिंद महाराज चवंडके यांनी नर्मदा महिम्याची अनुभूती भाविकांना घडविली.

Narmada Purana Katha : श्रावणात नर्मदा चरित्राचे श्रवण म्हणजे पुण्याची पर्वणी !
Narmada Purana Katha : श्रावणात नर्मदा चरित्राचे श्रवण म्हणजे पुण्याची पर्वणी !
येथील जागृत हनुमान मंदिराच्या सभामंडपात श्रावण महिन्यानिमित्त प्रथमच आयोजित नर्मदा कथा निरूपण सोहळ्याचे द्वितीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. कथा सोहळ्याच्या आयोजक शारदाताई वायाळ यांनी स्वागत केले. ह.भ.प. ज्योतीताई इंगळे यांनी स्वरचित आरती व नामगजर सादर केला. सिद्धेश्वर कपाळे व संध्याताई कपाळे, सुभाष सावके व दुर्गाताई सावके तसेच बाळासाहेब भुतेकर व पुष्पाताई भुतेकर या दाम्पत्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
Narmada Purana Katha : श्रावणात नर्मदा चरित्राचे श्रवण म्हणजे पुण्याची पर्वणी !
Narmada Purana Katha : श्रावणात नर्मदा चरित्राचे श्रवण म्हणजे पुण्याची पर्वणी !

IMG 20260826 WA0007

मिलिंद महाराज चवंडके म्हणाले की, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चतुर्युगांचा मिळून एक कल्प होतो. कृतयुगापासून नवीन कल्पाला प्रारंभ होतो. प्रत्येक कल्पाच्या अंती प्रलय, तर सात कल्पांच्या अंती महाप्रलय होतो. मायूर, कौर्म, पाद्म, तामस, मात्स्य, द्विरद आणि वाराह हे सात महाघोर कल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
भगवान शिवांनी जीवांचे पापक्षालन करण्यासाठी नर्मदेला प्रकट केले. नर्मदा हे नामकरणही भगवान शिवांनीच केले. शिवाच्या अंगातून उद्भवलेली नर्मदा ‘अमृता’ म्हणून विख्यात पावली.
Narmada Katha
Narmada Katha
नर्मदा ही अन्य नद्यांप्रमाणे केवळ जलधारा नसून सर्व जीवांना पापमुक्त करणारी परमेश्वराची विभूती आहे, असे सांगताना चवंडके महाराज म्हणाले की, भगवान शंकराचे वात्सल्यरूप असलेल्या नर्मदेचे कलियुगात भक्तिभावाने दर्शन घेणारा, नर्मदेची पायी परिक्रमा करणारा, काही काळ नर्मदा तीरावर वास्तव्य करणारा किंवा श्रद्धा-विश्वासाने नर्मदा पुराणाचे श्रवण करणारा भक्त नर्मदा मातेच्या कृपेची प्रचिती घेतल्याशिवाय राहत नाही. यावेळी त्यांनी नर्मदा मातेच्या महिम्याचे विविध प्रत्यक्षानुभव सांगून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
कथा सोहळ्यास  मंदाताई भुतेकर, नंदाताई भराड, रेखा इंगळे, मंदाकिनी ढवळे, रोहिणीताई देशमुख, कावेरीताई लोखंडे, अंजलीताई देशमुख, चंद्रकला टकले यांच्यासह स्त्री-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘नर्मदा’ नामस्मरणाचे पुण्य !

नर्मदा, शोणा महानदी, सुरसा, कृपा, मंदाकिनी, दशार्णा, चित्रकुटा, तमसा, विदशा, करभा, यमुना, चित्रोत्पला, विपाशा, रंजना आणि वालुवाहिनी या नर्मदेच्या पंधरा नावांचा प्रातःकाळी श्रद्धेने उच्चार करणाऱ्यास स्नानामुळे मिळणाऱ्या सर्व पुण्याची प्राप्ती होते, असे मिलिंद महाराज चवंडके यांनी नर्मदा पुराण निरूपणात सांगितले.
Chikhli MilindMaharajChavandke Narmada Purana Katha NarmadaKatha Shravan
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.